पुढील 24 तासांत मुसळधार; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

मुंबईसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे आहेत. तसेच कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.

Maharashtra Rain

Maharashtra Rain

Mumbai Rains : राज्यात काही भागात मुसळधार पाऊस होत आहे तर काही (Mumbai Rains) भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीपातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस कधी होणार याची वाट पाहिली जात असतानाच हवामान विभागाने (Weather Update) महत्वाची माहिती दिली आहे. मुंबईसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे आहेत. तसेच कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. तसेच मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी,  रायगड, सिंधुदुर्ग या  जिल्ह्यात मुंबई हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस होईल असा अंदाज आहे. या व्यतिरिक्त पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुढील 48 तास ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी

राज्यात काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. उत्तर भारतातील राज्यांत अजूनही उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. उष्माघाताचा त्रास अनेकांना सुरू झाला आहे. महाराष्ट्रातही तापमानात पुन्हा वाढ होत आहे. विदर्भात दिवसाचे तापमान चाळीशीच्या पुढे गेले आहे. परंतु, आता पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आज हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई,  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Rain : पुण्यात पावसाला सुरुवात; आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

साधारणपणे अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाम या राज्यांत मान्सूनचा एन्ट्री 5 जूनपासून होते. परंतु, मान्सूनची सध्याची गती पाहता एक ते दोन दिवस आधीच या भागात मान्सून दाखल झाला. आयएमडीने असा अंदाज व्यक्त होता की दक्षिण अरब समुद्र, लक्षद्वीप आणि बंगालच्या खाडीतील विविध ठिकाणी मान्सून पुढे सरकणार आहे. या दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version