Mumbai Landslide : मुंबईत इमारतीवरच कोसळली दरड; नागरिकांत घबराट

Mumbai Landslide : मुंबईत इमारतीवरच कोसळली दरड; नागरिकांत घबराट

Mumbai Landslide : राज्यात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी कहर मांडला आहे. या पावसामुळे इर्शाळवाडी येथे दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व भागात घरावर दरड कोसळली आहे. याआधी काल मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरही दरड कोसळण्याची घटना घडली होती. मुसळधार पावसात दरडी कोसळण्याचे सत्र सुरुच आहे.

Pune Traffic मध्ये अभिनेता शस्त्रक्रिया झालेल्या आईसह तब्बल सहा तास अडकला !

मागील काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस होत आहे. या पावसाने शहराची दैना उडाली आहे. रस्त्यात पाणी तर नेहमीचेच झाले आहे. वाहतूक ठप्प होत असल्याने मुंबईकर मेटाकुटीला आले आहेत. त्यात आता दरडींच्या संकटाने भर घातली आहे. अंधेर पू्र्व भागातील चाकाला परिसरात रामबाग सोसायटी येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास सोसायटी परिसरात असलेल्या डोंगराचा काही भाग सोसायटीतील चाळीवर कोसळला. यात रामबाग सोसायटीमधील पहिल्या मजल्यावरील चार ते पाच घरांमध्ये कोसळलेल्या दरडीचा काही भाग घुसल्याने घरांचे नुकसान झाले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी येथील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे नागरिक मात्र भयभीत झाले होते.

कोल्हापुरात पावसाचा कहर; पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 

दरम्यान, याआधी मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर दरड कोसळली होती. त्याआधी इर्शाळवाडी गावात मोठी दरड कोसळली होती. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. अजूनही बरेच जण ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या दुर्घटनेत सरकारी यंत्रणांनी शोध मोहिम राबवले.

कोल्हापुरात पावसाचा हाहाकार

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मागील 48 तासात संपूर्ण कोल्हापुरात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळे पंचगंगा नदी ओसंडून वाहत आहे. आज पहाटे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पुढील 48 तास कोल्हापूर जिल्ह्यासाठी महत्वाचे आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube