Download App

जरांगेला फिरायला वाळू माफियांच्या गाड्या, तो सगळ्या माफियांचा आका…; नवनाथ वाघमारेंचे टीकास्त्र

जरांगेला फिरालया वाळू माफियांच्याच गाड्या लागतात. जरांगेच सगळ्या माफियांचा आका आहे, असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला.

  • Written By: Last Updated:

Navnath Waghmare : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवाली सराटी येथे 15 फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी जरांगेंचा मेहुणा विलास खेडकर (Vilas Khedkar) याला जालना जिल्हा प्रशासनाने तडीपार केलंय. या कारवाईनंतर अनेकांनी थेट जरांगेंना टार्गेट करण्यास सुरूवात केली. आता ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमार (Navnath Waghmare) यांनीही जरांगेवर टीका केली.

आयकर विधेयक 2025, कायदा झाल्यास ‘या’ मोठ्या गोष्टी बदलणार 

जरांगेला फिरालया वाळू माफियांच्याच गाड्या लागतात. जरांगेच सगळ्या माफियांचा आका आहे, असा आरोप करत आता जरांगेच्या मागे साडेसाती लागली, असं वाघमारे म्हणाले.

नवनाथ वाघमारे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय. जरांगे म्हणाले, पापाचा घडा भरल्याने आता जरांगेला जेलमध्ये जावे लागणार. जरांगेला फिरायला वाळू माफियांच्याच गाड्या असतात. सरकारकडून जरांगेच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू झाले आहे. साखळी उपोषण हे बोगस उपोषण आहे, जरांगे हे उपोषणाच्या नावाखाली समाजाला वेड्यात काढायचं आणि राज्य सरकारला वेठीस धरायचं काम करतात. जर दम असेल तर जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण करावे, असं आव्हानही वाघमारेंनी केला.

बीड पोलिसांना तीन महिन्यांनंतर जाग; मुंडेंच्या आणखी एका निकटवर्तीयावर गुन्हा दाखल 

उपोषणाच्या नावाखाली पैसा गोळा करण्याचे काम जरागेचं असतंय. स्वत:च्या मेहुण्याला वाचवण्यासाठी जरांगेंचं उपोषण सुरू आहे, असा आरोपही वाघमारे यांनी केला.

जरांगेच्या मागे आता यापुढे साडेसाती लागली असून पापाचा घडा भरल्याने आता जेलमध्ये जावं लागणार असल्याचा टोलाही वाघमारेंनी लगावलाय. या वाळू माफियांवर कारवाई करून सरकारकडून जरांगेच्या मुसक्या आवळण्याचं काम सुरू आहे. आता सरकारही जरांगेला घाबरत नाही, असंही वाघमारे म्हणाले.

follow us