बीड पोलिसांना तीन महिन्यांनंतर जाग; मुंडेंच्या आणखी एका निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

बीड पोलिसांना तीन महिन्यांनंतर जाग; मुंडेंच्या आणखी एका निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

Parli Election Case Registerd Against Kailas Phad : बीड (Beed) पोलिसांनी तब्बल तीन महिन्यानंतर जाग आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. परळीत मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती. दरम्यान दादागिरी आणि मारहाण केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी राजेसाहेब देशमुखांसह अनेकांनी केली होती. घटनेनंतर तब्बल 82 दिवसांनी अखेर कैलास फड (Kailas Phad), त्याचा मुलगा निखील फड आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय.

याआधी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फडला अटक झाली होती. याप्रकरणी बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की, ज्यावेळी आम्ही सांगत होतो की परळीत कायदा आणि सुव्यवस्था (Beed Crime) ही वाल्मिक अण्णा आणि धनंजय मुंडेच चालवायचे. त्याचा प्रत्यय असा आहे की, ज्या मतदान केंद्रावर एवढी नाजूक घटना घडली. मी मतदान केंद्रावर गेल्यावर पोलिसांला देखील मारहाण झाली. माझ्या चांगल्या कार्यकर्त्याला माधव जाधवला रेषेच्या बाहेर मारहाण झाली. तरीही पोलिसांनी लगेच गुन्हा नोंद करून घेतला नाही.

खळबळजनक! PM मोदींच्या विमानाला दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

82 दिवस लागले कारण त्यांना कायद्याचं महत्वच वाटत नव्हतं. संतोष देशमुख यांच्या प्रकरणापासून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला गांभीर्य आलं असल्याचं राजेसाहेब देशमुख म्हणाले आहेत. सरकारने प्रत्येक भागात इंटरेस्ट घेतला. समाजातील प्रत्येक घटकाने ही गोष्ट लावून धरली. परळीचं जे बिहार झालंय, ते थांबविण्यासाठी देखील सरकारचे पावले दिसत असल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलंय. पहिल्यांदाच सरकारने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली दिसत आहे. त्यामुळेच हा गुन्हा नोंद व्हायला 82 दिवस लागलेले आहेत, असं देखील ते म्हणाले आहेत.

ट्रम्प यांचे व्याही प्रेम… दोन्ही मुलींच्या सासऱ्यांना दिली खास जबबादारी

मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी परळीतील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला होता. त्यावेळी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डला मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. तर कार्यकर्ते माधव जाधव यांना मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता कैलास फडवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कैलास फड हा मंत्री अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा (Dhananjay Munde) कार्यकर्ता आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube