नांदेडयेथील घटना ताजी असतानाच आता लातूर येथे एक घटना घडली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 4 दिवसांपूर्वी नांदेड येथील बोंढार या गावात संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. जातीवादी गावगुंडाकडून अक्षय भालेराव या बौद्ध तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली.
NCP : अहमदनगरमधील कार्यक्रम रद्द; वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनसाठी राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन
नांदेड येथील घटना ताजी असताना, आज लातूर येथील रेणापूर मध्ये एका सावकाराकडून अवघ्या 3 हजार रुपयांसाठी गिरीरत्न तबकाले या मातंग तरुणाची हत्या करण्यात आली. गेल्या 4 दिवसात ह्या 2 घटना घडल्या आहेत. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना या घटनेची साधी दखल घ्यायला वेळ नाही, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. माझा सवाल आहे राज्यसरकाराला दलितांचा जीव हा जीव नाही का..? दलितांचा जीव एवढा स्वस्थ झाला आहे का..?अशा शब्दात त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे.
राज्यात दलित सुरक्षित नाहीत. राज्यातील दलितांवरील होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही.
आरोपींना आम्ही सोडणार नाही. लवकरच राज्यभरात दलित अत्याचाराच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन आम्ही छेडणार आहोत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना घडणे हे अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी बाब आहे, असे ते म्हणाले.