Mla Ram Shinde: शिंदे यांच्यावर आता झारखंडची मोठी जबाबदारी

  • Written By: Published:
Mla Ram Shinde: शिंदे यांच्यावर आता झारखंडची मोठी जबाबदारी

Mla Ram Shinde: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास असलेले आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांच्यावर महाराष्ट्राबाहेर दुसऱ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येते. आता आमदार शिंदे यांच्यावर मोदी सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, प्रचार व प्रसार करण्यासाठी झारखंडची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांची झारखंडचे (Jharkahand) सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (mla-ram-shinde-jharkhand-inchagre-for promoting-modi-goverment-scheme)

Uddhav Thackeray : “मुलांना सुट्ट्या, काही जण परदेशात”; ठाकरेंच्या दौऱ्यावर अजितदादांचा खोचक टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला 9 वर्षे पुर्ण झाली आहेत. या निमित्ताने भाजपकडून 30 मे ते 30 जून या कालावधीत एक विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत संपूर्ण देशात विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी निवडक पदाधिकार्‍यांची टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम विविध प्रदेशात मोदी सरकारच्या योजनांची अंमलबजावणी व पुढील ध्येय धोरणे याचा प्रचार व प्रसार करणार आहे. त्यानुसार आमदार राम शिंदे यांची झारखंडचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अन् संजय राठोड पोहोचले अमित शाहांच्या भेटीला

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, महामंत्री बी.एल.संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी चार लोकसभा मतदारसंघासाठी ही टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रभारी व सहप्रभारी नियुक्त झालेले पदाधिकारी संबंधित लोकसभा क्षेत्रात जातील. तेथे केंद्र सरकारच्या योजनांची होत असलेली अंमलबजावणी, योजनांचा लाभ मिळालेल्यांच्या प्रतिक्रिया, भाजपा पक्षाची तेथील स्थितीबाबत खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. आमदार राम शिंदे यांच्यावर यापूर्वी गोवा, कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube