Rupali Thombare On Sushma Andhare : साताऱ्यामध्ये काल भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांना बोलताना अश्रू अनावर झाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हजेरी लावली होती. शरद पवारांसमोरच त्यांना अश्रू अनावर झाले. पण यावेळी बोलताना अंधारे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची तक्रार शरद पवारांकडे केली होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारे या बहिणीच्या नात्याने बोलल्या असतील. सुषमा अंधारेंवर सत्ताधारी गटाकडून खालच्या पातळीवर टीका करण्यात येते आहे. सत्ताधारी पक्षातील मंत्री त्यांच्यावर बोलतात. त्यामुळे त्यांना बहिणीच्या नात्याने वाटलं असेल की भाऊ बोलला नाही. पण आम्ही अजितदादांच्या सांगण्यावरुनच त्यांच्या पाठीमागे उभ्या होतो, असे त्या म्हणाल्या आहेत.
सुषमा अंधारेंचे भावनिक होणे स्वाभाविक आहे. अशा प्रकारे सातत्याने चारित्र्याचे हनन करण्यात येते आहे. यावर त्या बोलल्या आहेत. त्यांनी बहीण म्हणून भाऊ न बोलल्याची खंत शरद पवारांकडे व्यक्त केली असेल, असे त्या म्हणाल्या आहेत.
पक्षासाठी कसरत करणाऱ्यांनी दुसऱ्यावर बोलूच नये; फडणवीसांचा पुन्हा पवारांना टोला
सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या?
सुषमा अंधारे म्हणाल्या, माझ्या बापाबद्दल लोकं वाटेल त्या पद्धतीने बोलत आहेत. कसं असतंय, शेतात नांगरणी होते त्यानंतर पेरणी, आणि मग पहिला पाऊस होतो. पाऊस झाल्यानंतर कसदार पीक येतं. कणंसं येतात. कणसं भरल्यानंतर मळणी यंत्रणातून धान्य येतं. त्यावेळी येणारे-जाणारे त्या धान्याच्या ढिगाकडे पाहुन दुसरा माणूस म्हणतो, पीकाकडे काय बघतो, जमीनच एवढी भारी आहे तर पीकं तर येणारचं, या शब्दांत अंधारेंनी विरोधकांना सुनावलंय.