Download App

दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार का? शरद पवारांच्या शिलेदाराचं सूचक विधान

  • Written By: Last Updated:

Chetan Tupe Statement On Ajit Pawar And Sharad Pawar Alliance : राजकीय वर्तुळात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार चेतन तुपे यांनी मोठा खुलासा केलाय. दोन्ही पवार एकमेकांना भेटत आहेत. एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे जर महाराष्ट्राची इच्छा असेल, तर त्याप्रमाणे ते करतील असं आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी स्पष्ट केलंय. तुपेंच्या सूचक विधानामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगलेली आहे.

देशमुख प्रकरणावरून अंजली दामानियांचा रामदास आठवलेंसमोर तीव्र निषेध, म्हणाल्या ही माणूसकी..

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार चेतन तुपे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात ज्या काही गोष्टी होत्या, त्याबाबत आज शरद पवार यांच्यासोबत बैठक (Maharashtra Politics) होती. पश्चिम विभागातील ज्या शाखा आहेत, त्याबद्दल ही चर्चा होती. रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी आज पवार साहेबांच्या भेटीला आलो होतो. आता वर्ष संपत आहे आणि 2025 सुरु होत आहे. या वर्षात रयत शिक्षण संस्थेने काही उपक्रम राबवायचे ठरवले आहे.

मोठी बातमी! शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा भीषण अपघात, मद्यधुंद ट्रक चालकाची धडक

त्यावर चर्चा करण्यासाठी साहेबांनी आज वेळ दिली होती. त्या संदर्भात चर्चा देखील झाली. माझे आणि साहेबांचे कौटुंबिक संबंध आहेत. प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडू नये. महाराष्ट्राची संस्कृती आहे की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवले पाहिजे. साहेबांना आज रयतचे काही इतर लोकं सुद्धा भेटले असल्याचं देखील चेतन तुपे यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवासानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांना सहकुटूंब वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी काका पुतण्यामध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं. या भेटीनंतर मात्र अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी आमदाराच्या वक्तव्यानं पुन्हा या चर्चेने जोर धरलाय. दोन्ही गटानं एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची देखील इच्छा असल्याचं समोर येतंय.

 

follow us