Download App

मनावर दगड ठेवून निलेश लंकेंनी निर्णय घेतला… अजितदादांच्या गोटात दाखल

NCP Political Crisis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. 2) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटात कोण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात कोण याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. अशातच अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजितदादांसोबत राहणार असल्याचे जाहीर केले असून ते अजित पवार यांच्या बैठकीसाठी उपस्थित झाले आहे. ( MLA Nilesh Lanke Join Ajit Pawar Camp )

मुंबईमध्ये आज शरद पवार व अजित पवार या दोघांकडून आज बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत कुणाकडे सर्वाधिक आमदार आहे, ते स्पष्ट होणार आहे. त्या अगोदर निलेश लंके हे अजितदादांच्या गोटात सामिल झाले आहे. निलेश लंके हे अजितदादांच्या शपथविधी सोहळ्यालादेखील उपस्थित होते. त्यानंतर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असे त्यांनी ट्विट केले होते. निलेश लंके यांनी दोन अजितदादांच्या शपथविधीनंतर भावनिक पोस्ट ट्विट केले होते. त्यात ह्या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक असल्याची भावनिक साद त्यांनी घातली होती.

आमचा बाप काढणारेच उरले एक फुल दो हाफ! सामनाला उत्तर अन् शेलारांचा ठाकरेंना टोला

काय म्हणाले होते निलेश लंके 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,मा.अजितदादा पवार व मा.सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते व कुटुंब प्रमुख आहेत. ह्या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे.
सद्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे. तरी येणाऱ्या दोन दिवसात सर्वाना अपेक्षित असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो!

दरम्यान,  काही वेळापूर्वीच अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला असून ते शरद पवारांच्या बैठकीसाठी उपस्थित झाले आहे. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर आहे, असे लहामटे यांनी म्हटले आहे. अजित पवार यांची MET इन्स्टिट्यूट येथे बैठक होत असून शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक होत आहे.

राष्ट्रवादीत लेटर बॉम्ब, ‘त्या’ पत्राबद्दल पवारांच्या खास माणसाने केला खळबळजनक खुलासा…

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार आहेत. त्यातील तीन आमदार अजित पवारांबरोबर असल्याची चर्चा होती. यात आमदार संग्राम जगताप, नीलेश लंके व डॉ. किरण लहामटे यांचे नाव होते. मात्र लहामटे यांनी आज सकाळीच आपण शरद पवार यांच्या समवेत असल्याचे सांगितल्याने अजित पवार यांच्या गटात आता नगर जिल्ह्यातील किती आमदार राहतील यावर चर्चा रंगली आहे. तसेच नगर जिल्ह्यातील प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, रोहित पवार हे आमदार शरद पवारांसोबत आहे.

Tags

follow us