Neet Exam Paper Leak : शिवराज मोटेगावकर निघाला झोलकर…पेपरफुटीचा सुनियोजित कट? CBI कडून सगळंच उघड

नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर झोलकर निघाल्याचं सीबीआयच्या तपासात उघड झालंय.

Untitle (8)

Untitle (8)

Neet Exam Paper Leak : बहुचर्चित नीट परीक्षा पेपर लिक प्रकरणात (Neet Exam Paper Leak) अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सीबीआयने केलेल्या तपासात आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकरच (Shivraj Motegoankar) झोलकर निघाल्याचं निष्पन्न झालंय. आपल्या कोचिंग क्लासचे प्राध्यापक पी.व्ही कुलकर्णी याची प्रश्नपत्रिका पॅनेलवर नियुक्ती ते विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवणे, हा संपूर्ण सुनियोजित कटच असल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. या संपूर्ण कटामध्ये शिवराज मोटेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी, मनिषा मांढरे आणि मनिषा वाघमारे हेच मुख्य सुत्रधार असल्याची माहिती समोर आलीयं. त्यामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडालीयं.

मोदींचं आवाहन एका बाजूला अन् कोल्हापुरी नाद दुसऱ्या बाजूला; जावयासाठी बनवले ‘चांदीचे जोडे’

नीट परीक्षा फुटी प्रकरणी सीबीआयने आरसीसी कोचिंग क्लासचे प्राध्यपक पी.व्ही कुलकर्णी आणि मॉर्डन कॉलेजच्या प्राध्यापिका मनिषा मांढरे हिला अटक केल्यानंतर आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरांचं नाव समोर आलं. त्यानंतर सीबीआयने सुरुवातीला मोटेगावकरची लातूरला जात साधी चौकशी केली. चौकशी केल्यानंतर मोटेगावकरचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला. यामध्ये डिलिट केलेला डेटा रिकव्हर केल्यानंतर मोबाईलमधील प्रश्न आणि नीट परीक्षेतील प्रश्न अगदी तंतोतंत जुळले. त्यानंतर मोबाईल घेण्यासाठी मोटेगावकरला पुण्याला बोलवले. मोटेगावर आपल्या ड्राईव्हरसोबत सीबीआयच्या पुण्यातील कार्यालयात आला असता, सीबीआयने त्याला अटक केलीयं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीला रवाना केलंय.

जंगली म्युझिकने सर्वात मोठ्या विनोदी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’चे धमाकेदार टायटल सॉंग केले प्रदर्शित

केमिस्ट्री, बायोलॉजी पेपरफुटीचा सुनियोजितत कट?
शिवराज मोटेगावकरने क्लासमध्ये कार्यरत असलेल्या पी.व्ही कुलकर्णीची(केमिस्ट्री) एनटीएच्या प्रश्नप्रत्रिका कमिटीवर नियुक्ती करुन घेतली होती. तर मनिषा मांढरे (बायो) ही देखील प्रश्नपत्रिका बनवण्याच्या कमिटीवर होत्या. दोघेही प्रश्नपत्रिका फोडणार आणि मोटेगावकरपर्यंत पोहोचवणार अशी सोय करण्यात आल्याचा संशय सीबीआयला आहे.
अर्थिक ताकदीच्या बळावर हा सुनियोजित कट आखल्याचाही सीबीआयला संशय आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी आरसीसी कोचिंग क्लासेसचा प्राध्यपाक पी.व्ही कुलकर्णी, मॉर्डन कॉलेजच्या प्राध्यापिका मनिषा मांढरे, आरसीसीचे कोचिंगचे संचालक शिवराज मोटेगावकर, शुभम खैरनार, मनिषा वाघमारे, धनंजय लोखंडे यांना अटक करण्यात आलीयं. यासोबतच इतर कोणत्या कोचिंग क्लास अथवा आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे.

मनिषा मांढरेचं निलंबन…
मॉर्डन कॉलेजमध्ये बायोलॉजी विषयाच्या प्राध्यापिका असलेल्या मनिषा मांढरे हिला सीबीआयने अटक केल्यानंतर अखेर मॉर्डन कॉलेजच्या प्रशासनाकडून मनिषा मांढरे हिला निलंबन केलं आहे.

Exit mobile version