Download App

Ahmednagar : वाळू धोरणावरुन तनपुरेंनी महसूलमंत्र्याना घेरलं, वाळू वाहतूकदारांकडून लूट…

Ahmednagar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील (NCP Sharad Pawar group) आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)हे सरकारी वाळू डेपोबाबत आक्रमक झाले आहेत. तनपुरे यांनी हा प्रश्न विधानसभेत (Assembly)उपस्थित करत महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले. सरकारी वाळू विक्री व्यवस्थेतील त्रुटीकडे तनपुरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. वाळु वाहतूकदारांनी ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर घेत असल्याचा आरोप करत, यामध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी यावेळी आमदार तनपुरे यांनी केली.

Crakk Teaser: “जिंदगी तो साला सब के साथ खेलती है”, विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’चा टीझर प्रदर्शित

यावेळी सभागृहात तनपुरे म्हणाले की, वाळू धोरण हे शासनाने आणलं मी स्वागत केलं. वाळू तस्करी होणार नाही कायदा सुव्यवस्था राखल मात्र असे नव्हतं मी सहज एका वाळू डेपोला भेट दिली. सहाशे रुपये ब्रास मध्ये शेतकऱ्यांना वाळू मिळणार अशी घोषणा झाली मात्र प्रत्यक्षात वाहतुकीचे दर यामध्ये पारदर्शकता आहे.

141 खासदारांचं निलंबन! शरद पवारांनी केंद्राला धरलं धारेवर; म्हणाले, ‘संसदरत्न..,’

प्रति किलोमीटर 60 ते 70 रुपये असे ठरले आहे, मात्र प्रत्यक्षात वाहतूकदार तीनशे रुपये प्रति किलोमीटर दर आकारत आहेत. तसेच चोरीने ज्याप्रकारे वाळू पद्धतीने मिळत असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. चोरीची वाळू लवकर तरी मिळत होती मात्र येथे चार-चार, पाच-पाच दिवस वाट पाहावी लागत असल्याच्या तक्रारी देखील शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या.

यामध्ये पारदर्शकता आणावी यासाठी मी महसूल मंत्र्यांची भेट देखील घेतली असून, त्यांना याबाबत कल्पना देखील दिली आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात यावी अशी मागणी देखील मी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.

सरकारने ठरवलेले वाळू वाहतुकीचे दर व्यवहार्य नाहीत. त्यात दुरुस्ती गरजेची आहे. वाळू वाहतूकदार सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारतील. तसे होतदेखील असेल, अशा प्रकारांवर सरकार लक्ष ठेवणार का? तक्रार झाल्यास कारवाई झाली पाहिजे, असेही आमदार तनपुरे यांनी म्हटले.

Tags

follow us