IAS Pooja Khedkar : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात (IAS Pooja Khedkar) आता अहमदनगर कनेक्शन समोर आलं आहे. पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत (Ahmednagar) प्रश्न उपस्थित केले जात होते. आता या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकरला नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र सन 2018 मध्ये देण्यात आले होते. तसेच सन 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Pooja Khedkar : पूजा खेडकर पुणे व्हाया वाशिम.. रुजू होताच म्हणाल्या, सॉरी मी..
पूजा खेडकर यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयाने दिले आहे. 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 ला मानसिक आजाराचे प्रमाणपत्र दिले आहे. डोळे आणि मानसिक आजार यांचे एकत्रित 2020 आणि 2021 ला प्रमाणपत्र दिले आहे. शासकीय रुग्णालयातील कागदपत्रे तपासली असता त्यात नोंदी आढळून आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय घोगरे यांनी माध्यमांना दिली.
परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या थाटाला पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेही वैतागले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूच्याच केबिनची मागणी करणे, वरिष्ठांचे अँटी चेंबर बळकावणे, घराच्या मागणीवर अडून बसणे, शिपाई आणि अन्य मदतनीसांची मागणी करणे, ऑडीसारख्या अलिशान गाडीतून ऑफिसला येणे, शिवाय याच खासगी गाडीला अंबर दिवा बसवून घेणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालणे अशा थाटात खेडकर यांचा पुण्यात वावर होता. शासनाने त्यांची बदली करावी अशी मागणीच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केली होती. त्यानुसार खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली.
दिल्लीत फिरली तपासाची चक्रे, दोषी आढळल्या तर थेट नारळ; पूजा खेडकर प्रकरण नव्या वळणावर
वादग्रस्त अपगंत्व प्रमाणपत्र देऊन IAS ची पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय वडिलांची 40 कोटींची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. तब्बल सहावेळा पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचे टाळले. तसेच नुकतीच बदली झालेल्या वाशिमला देखील त्या रूजू झालेल्या नाहीत. खेडकर हे व असे अनेक कारनामे समोर येत आहेत.