नगरकरांनो सावधान! पुढील काही तासांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

नगरकरांनो सावधान! पुढील काही तासांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rainfall)) होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकच जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची जोरदार बॅटींग सुरु असल्याचं चित्र दिसून येत आहे. घाटमाथ्यावरील जिल्ह्यांना हवामाना विभागाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला असून यामध्ये आता अहमदनगरमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीयं. राज्यात मान्सूनच्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. 9 जुलै रोजी पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. पुणे, मुंबई आणि सातारा या जिल्ह्यांना 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलायं.

सत्ताधारी विरोधकांत पुन्हा घमासान; ‘या’ समित्यांवर इंडियाचा डोळा, NDA चाही रेडी प्लॅन

दरम्यान, राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरु असल्याने पावसाचा अंंदाज पाहता मंगळवारी पुणे शहरासह जिल्ह्यातील इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीयं. मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथेही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन :
नागरिकांनी मुसळधार पावसादरम्यान, झाडाखाली उभे राहु नये.
गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये.
ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये.
सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या केबल्सपासून दूर रहावे.
जाहीरातींच्या फलकाजवळ नागरिकांनी थांबू नये.
सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षित स्थळो स्थलांतर करावे.
स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

दरम्यान, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube