Download App

नगरकरांनो सावधान! पुढील तीन-चार तासांत पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

Ahmednagar Rain News : मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनूसार राज्यातील अनेक भागांत काल अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नगर, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस बरसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल रात्रीच्या सुमारास पावसाने (Ahmednagar Rain Update) तुफान बॅटिंग केली आहे. अशातच आज पुन्हा हवामान विभागाने नवीन अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन-चार तासांत जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ठाकरे गटाचे मिशन लोकसभा : 10 शिलेदार मैदानात; संजय राऊतांवर सर्वात मोठी जबाबदारी

जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी नगर शहरासह मुसळधार पाऊस झाला. मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले. दरम्यान पुन्हा एकदा हवामान खात्याचा नव्याने इशारा आला असून नगर जिल्ह्यात येत्या काही तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि योग्य ती काळजी घ्यावी आपत्कालीन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

‘अवकाळीने’ पिके उध्वस्त! आमदार लंके शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसान भरपाईची मागणी

हवामान विभागाचा नवा अंदाज :
राज्यातील पालघर, मुंबई, अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढील तीन ते चार तासांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची देखील शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागरिकांनी बाहेर पडण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी असे, आवाहन प्रशासनाने केले आहे.

भुजबळ-मुंडेंनी पक्ष काढला असता तर मुख्यमंत्री होऊन आलो असतो : जानकरांनी सांगितली भुतकाळातील चूक

अवकाळीने बळीराजा हतबल :
थंडीची चाहूल लागलेली असतानाच अचानक राज्यात अवकाळी ने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी वातावरण पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यातच पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट झाली. गारपिटीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. अनेक ठिकाणी शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली तर अनेक ठिकाणी फळबागा देखील मोठे नुकसान झाले.

“प्रकाश आंबेडकरांनी अडचणीत असताना सहकार्य करावे” : छगन भुजबळ यांचे आवाहन

बळीराजाची शासनाकडे मदतीची हाक :
यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यातच पावसा व्हावी पिके वाया गेली. दरम्यान पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी शेतात पिके घेतली. मात्र पुन्हा एकदा अवकाळी ने जिल्ह्यात हजेरी लावत शेतातील उभे पिके जमीन दोस्त करण्याची काम केले. शेतकऱ्यावरती संकट ओढवले. दरम्यान प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

Tags

follow us