भुजबळ-मुंडेंनी पक्ष काढला असता तर मुख्यमंत्री होऊन आलो असतो : जानकरांनी सांगितली भुतकाळातील चूक
हिंगोली : छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे एकत्र आले असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती. या दोन्ही नेत्यांनी पक्ष काढला असता तर मी इथे मुख्यमंत्री म्हणून आले असतो, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भुतकाळात ओबीसींची ताकद एकवटली नाही, अशी अप्रत्यक्षपणे चूक झाल्याचे सांगितले . ते हिंगोली येथे दुसऱ्या ओबीसी एल्गार सभेत बोलत होते. (Rashtriya Samaj Party leader Mahadev Jankar requested OBC leader Chhagan Bhujbal to form a new party)
जानकर म्हणाले, भुजबळसाहेब, छोटा का होईना आम्ही आमचा पक्ष काढला. तुम्ही आमचे नेते आहात. तुम्हीही एक पक्ष काढा. आम्ही तुमच्याबरोबर युती करायला तयार आहोत. तुम्ही म्हणाल ती जागा सोडू. आम्ही तुम्हाला पैसाही कमी पडू देणार नाही, असे म्हणत यावेळी जानकर यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आता तरी ओबीसी समाजाचा पक्ष काढावे असे आवाहन केले. तसेच त्यांच्यासोबत युती करणार नाही, असे म्हणत भाजपलाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला.
आतापर्यंतच्या कुणबी नोंदी स्थगित करा अन् शिंदे समिती बरखास्त करा : भुजबळांची सर्वात मोठी मागणी
छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे एकत्र आले असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती. या दोन्ही नेत्यांनी पक्ष काढला असता तर मी इथे मुख्यमंत्री म्हणून आले असतो. पण, आमच्या काही चुका झाल्या आहेत. आता कोणाला शिव्या देण्यात वेळ घालवू नका. तुम्ही सत्ताधारी बना, तुम्ही डिमांडर नाही तर कमांडर बना. शंभरात 85 ओबीसी असतील तर मला तिकिट द्या अन् मला आमदार करा न मला खासदार करा म्हणून छोट्या लोकांना मागायला कशाला जायचे? असेही जानकर म्हणाले.
छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका, ओबीसी-मराठा वादाला हिंगोलीतून फोडणी?
स्वतः समर्थनार्थ पुढे या :
छगन भुजबळ यांनीही यावेळी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांना पाठिंबा द्यायला स्वतःहुन पुढे येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “माझी सर्वपक्षीय नेत्यांना विनंती आहे, अधिकाराच्या लढाईत निमंत्रण पाठवली जात नाही. ज्यांचा जमीर जिंदा आहे ते स्वत:समर्थनात पुढे येतात. अगर आप जिंदा हो तो जिंदा आणा भी जरुरी है. आपल्या अधिकारावर गदा येत असेल तर विरोध करायला हवा, असेही ते म्हणाले.