‘अवकाळीने’ पिके उध्वस्त! आमदार लंके शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसान भरपाईची मागणी

‘अवकाळीने’ पिके उध्वस्त! आमदार लंके शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसान भरपाईची मागणी

अहमदनगर – नगर शहरासह रविवारी पारनेर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झाली. गारपिटीमुळे शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त झाली. अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी व नुकसानीची पाहणीसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे भल्या सकाळीच शेतकऱ्यांच्या (Farmer) बांधावर पोहचले. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करत लंके यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदत मिळवून देण्याच्या आश्वासन दिले.

Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : अल्बर्ट लेप्चा ठरला ‘सा रे ग म प 2023’चा विजेता! म्हणाला, ‘सपना सच हो गया’ 

रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीने पारनेर तालुक्याच्या विविध गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकतेच आमदार लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. तालुक्यातील अनेक भागात रविवारी दुपारी मोठ्या गारपीटीसह वादळी पाऊस झाला. यात उभी पिके अक्षरशः आडवी झाली. आज पहाटेचे लंके यांनी पानोली परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

मोठी कारवाई! गझवा-ए-हिंद मॉड्यूलचा एनआयएकडून पर्दाफाश, चार राज्यात छापेमारी 

दरम्यान, पारनेर तालुक्यातील अनेक परिसरामध्ये झालेली गारपीट आणि वादळी पाऊस वारा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे शेतातील कांदा, ज्वारी, टोमॅटो अशी सर्वच पिके भुईसपाट झाले असून पूर्णपणे नष्ट झाल्याचे चित्र आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी याबाबत आमदार लंके यांना कल्पना दिली. तसेच खुद्द लंके यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली. या नुकसानीचे तातडीने पंचनामे व्हावेत आणि केवळ पंचनामे न होता सरकारने शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी लंके यांच्याकडे केली.

लंकेचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात लंके यांनी म्हंटले कि, माझ्या मतदार संघातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे. या अवकाळी वादळी पाऊस व गारपीठ मुळे पारनेर-नगर मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. पारनेर-नगर मतदार संघातील गावांमध्ये जुन, जुलै व ऑगस्टमध्ये अजिबात पाऊस पडलेला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्याचे एक पिक वाया गेले होते. त्यानंतर काही ठिकाणी पडलेल्या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती.

हे पिक आता हाताशी आले असतानाच या अवकाळी वादळी पाऊसामुळे व गारपीठ मुळे तेही पिक वायाला गेले आहे. याचबरोबर फळबागा , रब्बी व नगदी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. पारनेर तालुका हा आधीच दुष्काळी, पठारी व अदिवाशी भाग आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. यामुळे या गारपीठ व अवकाळी वादळी पावसाने नुकसान झालेल्या भागांचे तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत अशी मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube