Download App

Utkarsha Rupwate : काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभेच्या रिंगणात…

Utkarsha Rupwate : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024)पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. यातच राज्यात घडलेल्या अनेक घडामोडीनंतर तसेच पक्ष फुटीनंतर अनेक समीकरणं देखील बदलली आहेत. यातच नगर जिल्ह्यात शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi Loksabha)काँग्रेस देखील आग्रही आहे. काँग्रेसकडून (congress)युवा चेहरा म्हणून उत्कर्षा रुपवते Utkarsha Rupwate यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. गावपातळीवर जनमाणसांशी असलेली पकड व गेली अनेक वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ, अशी खास ओळख असलेल्या रुपवते या शिर्डी लोकसभेसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ठाकरे गट या जागेसाठी आग्रही आहे. मात्र दलबदलूंपेक्षा एकनिष्ठ कार्यकर्त्यांना ही जागा लढवण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी जनमाणसातून होत आहे.

राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यानंतर यंदाची नगर दक्षिण व उत्तर लोकसभा हा चर्चेचा विषय ठरला आहे. नगर दक्षिणमधून अद्याप लोकसभेचे उमेदवार फायनल झाले नाहीत. उमेदवारांच्या नावाच्या चर्चा सुरु झाली आहे, मात्र अंतिम नाव अद्याप घोषित झालेलं नाही. तर शिर्डीमध्ये देखील यंदाची लोकसभा निवडणूक चांगलीच रंगतदार पाहायला मिळणार आहे. शिर्डी लोकसभा ही आरक्षित असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची नावे समोर येऊ लागली आहेत. शिर्डीसाठी यंदा ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेससह मनसेकडून देखील चाचपणी सुरु आहे. यातच पक्षफुटीनंतर उमेदवारीची गणित देखील बिघडली आहे.

2019 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे टॉप 5 अन् काठावर निवडून आलेले टॉप 5 खासदार…

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शिर्डी मतदार संघ सध्या शिवसेनेकडे आहे. गेली दोन टर्म शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे खासदार राहिले आहे. मात्र पक्ष फुटीनंतर आता शिंदे गट व ठाकरे गट या जागेसाठी आग्रही आहे. मात्र ठाकरे गटात आलेले भाऊसाहेब वाकचौरे हे अनेक पक्ष फिरुन आले आहेत. यामुळे अशा दलबदलू उमेदवारांपेक्षा काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या व राजकीय वारसा लाभलेल्या युवा व अभ्यासू अशा उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Utkarsha 15

दलबदलूंपेक्षा एकनिष्ठांना संधी द्या…रुपवतेंची हाक
शिर्डी लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाची मोठी ताकद असल्याने ही जागा कॉंग्रेस पक्षालाचं मिळावी अशी मागणी रुपवते यांनी केली आहे. शिर्डीची जागा कॉंग्रेसने आपल्याकडेच ठेवून, पक्ष बदलुंना मविआने संधी देवू नये, अशी मागणी रुपवते यांनी केलीय. जागा वाटपामध्ये असे झाल्यास जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येथील उमेदवार निश्चित निवडून येईल, असा विश्वास उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केला. तसेच त्या म्हणाल्या की, माझे आजोबा दादासाहेब रुपवते यांच्यापासून आमची तिसरी पिढी कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. प्राधान्यक्रमाने शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आमचाचं हक्क असून काँग्रेस पक्षाचे पक्षश्रेष्ठी मला न्याय देतील व शिर्डी लोकसभा निवडणूक लढविण्यास संधी देतील,
असा विश्वास यावेळी रुपवते यांनी व्यक्त केला.

Utkarsha 12


हेमंत पाटलांना धोक्याची घंटा! भाजप हिंगोली घेण्याच्या अन् सरप्राईज उमेदवारही देण्याच्या तयारीत

…तर रुपवते यांचे तिकीट फायनल
उत्कर्षा रुपवते या शिर्डी लोकसभा या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविण्याठी इच्छुक आहेत. शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रुपवते यांनी युवक कॉंग्रेसमध्येही काम केलेले आहे. माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या नात आणि प्रदेश कॉंग्रेसचे माजी प्रवक्ते प्रेमानंद रुपवते यांच्या त्या कन्या असल्याने राजकीय वारसा घरातूनच त्यांना मिळाला आहे. शिर्डीची जागा कॉंग्रेसला आली तर उत्कर्षा रुपवते यांची उमेदवारी फायनलच असणार असे बोलले जात आहे.

Utkarsha 13


follow us

वेब स्टोरीज