Ahmednagar Loksabha : अहमदनगरमधील ( Ahmednagar Loksabha ) सुपा येथे निलेश लंके यांनी जनसंवाद मेळावा घेतला. यामेळाव्यात त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून लोकसभा लढवण्याचा निर्णय देखील जाहीर केला. या दरम्यान त्यांनी विखे कुटुंबियांवर गंबीर आरोप देखील केले. दरम्यान लंके यांच्या आरोपांना मंत्री राधाकृष्ण विखे यांनी उत्तर दिले आहे. तसेच त्यांच्या आरोपांकडे मी गांभीर्याने पाहत नाही. विकासकामांसाठी अजित पवारांकडून निधी मिळाल्याचे लंके म्हणाले तर दुसरीकडे विकासकामे अडवली जात असल्याचा आरोप लंके यांनी केला. यावर अजित पवारच खुलासा करतील असे प्रतिपादन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
आम्ही जाऊन आणखी बिघाड… म्हणून मविआशी समझोता तुटला; आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं
पालकमंत्र्यानी मला संवण्याचा डाव आखला होता असा आरोप निलेश लंके यांनी केला होता. लंकेच्या आरोपावर बोलताना मंत्री विखे म्हणाले, आरोप प्रत्यारोप हे होत असतात. स्वतःचे अपयश झाकवण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. लंके यांनी केलेल्या आरोपांकडे मी गांभीर्यानी बघत नाही असा पलटवार विखे यांनी केला.
Baramati Lok Sabha : भाजपनं आमचं घर फोडलं अन्.. सु्प्रिया सुळेंची घणाघाती टीका
विखे कुटुंबियांकडून आपल्याला त्रास झाल्याची खंत देखील लंके यांनी आपल्या जाहीर मेळाव्यात व्यक्त केली होती. यावर बोलताना विखे म्हणाले, त्यांना काय त्रास झाला हे काय मला माहित नाही यामुळे यावर भाष्य मी करणार नाही. मात्र निवडणूक ही निवडणूक असते. यातच आता त्यांना आमच्या महायुतीच्या उमेदवार विरोधात लढण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे ते टीका करणार आहे. ते थोडीच आमचे गुणगाण गाणार असे विखे म्हणाले.
राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार गटात जात लंके यांनी निधी घेत विकास कामे केल्याचे मेळाव्यातून जाहीर केले. तर दुसरीकडे विकासकामे अडवली जातात असा आरोप देखील यावेळी लंके यांनी केला होता. याबाबत अजित पवार यांच्याशी काही चर्चा झाली असे विखेंना विचारले असता त्याचा खुलासा स्वतः अजित पवारच करतील असे उत्तर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले.