Download App

‘अर्बन’ बॅंक घोटाळ्यातील आरोपींवर कारवाईचा बडगा! 58 आरोपींच्या मालमत्तेचा होणार लिलाव

  • Written By: Last Updated:

नगर : नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank) गैरव्यवहार प्रकरणातील फॉरेन्सिक ऑडिट (Forensic Audit) नुसार संशयित आरोपीची संख्या २०५ झाली असून फारिसिक ऑडीट करणाऱ्या कंपनीकडून अद्यावत अहवाल मागितला आहे. त्यामुळे यात आरोपींची संख्या आणखी वाढणार आहे. ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल झाल्याने सुमारे ५८ संशयित आरोपीच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरू झाली असल्याचे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (Deputy Superintendent of Police Sandeep Mitke) यांनी सांगितले.

CM शिंदेंच्या उपस्थितीत शिवजन्मसोहळा साजरा; छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला परिसर, शिवभक्तांची अलोट गर्दी 

अर्बन बँक बचाव समिती, ठेवीदार, बँक अवसायक पोलीस यांची संयुक्त बैठक शनिवार (दि. १७) रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात झाली. या बैठकीला गणेश गायकवाड, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, बैंक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांच्यासह ठेवीदार, बँकेचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला राजेंद्र गांधी यांनी ठेवीदारांना त्यांच्या पाच लाखाच्या पुढील ठेवी परत मिळण्यासाठी अवसायक व पोलिसांनी प्रयत्न करावे, ठेवीदारांना दोघांकडून खूप अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केली.

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या हटके अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना 

बॅंकीतील पाच लाखाला पुढील ठेवी देण्यासाठी बँकेला सुमारे १७५ कोटींची गरज आहे. आतापर्यंत ४ कोटी २५ लाख वसूल झाले आहे. बँकेकडे सध्या ४० कोटी शिल्लक आहे. ठेवीदारांना त्यांचे पैसे लवकर परत मिळून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. बॅंकेचा परवाना ४ ऑक्टोबर २०२३ रोजी रद्द केला. त्या दिवसापर्यंत खातेदारांच्या खात्यावर शिल्लक असलेली रक्कमच त्यांना परत करण्यात येणार आहे, असे बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी अवसायक गायकवाड म्हणाले, केवायसी पूर्ण करण्यावर भर दिला आहे. केवायसी पूर्ण होताच ठेवीदारांना डिपॉझिट गॅरंटी कार्पोरेशन मार्फत पैसे मिळणार नाही. सध्या ११ हजार ३५६ खातेदारांची केवायसी पूर्ण झाली आहे. या वेळी आम्ही बँकेत ठेवी ठेवल्या त्या आम्हाला परत मिळत नाही. मुलांचे शिक्षण, लग्न, आजारपणासाठी पैशाची आवश्यकता असल्याची भावना उपस्थित ठेवीदारांनी व्यक्त केली. यावर गायकवाड म्हणाले, बँकेच्या १७ शाखा बंद करण्यात आल्या आहेत. त्यापोटी खर्च होणाऱ्या पैशाची बचत होणार आहे. तसेच वसूलीसाठी पथके तयार करण्यात आली असून ४०० कोटी वसूल करण्याचा प्रयत्न आहे.

follow us