नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई, डॉ. शेळकेच्या मुसक्या आवळल्या

नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई, डॉ. शेळकेच्या मुसक्या आवळल्या

अहमदनगर – नगर अर्बन बँकेच्या (Nagar Urban Bank) कर्ज प्रकरणाची फसवणूक केल्याप्रकरणी नगर येथील डॉक्टर निलेश शेळके (Nilesh Shelke) याला अखेर आर्थिक गुन्हे विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी शेळके याला मंगळवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पुणे शाखेचे पोलीस उप अधीक्षक अमोल भारती (Amol Bharti) यांनी दिली आहे.

IND vs AUS: मिचेल स्टॉर्कच्या चिंध्या उडवत हिटमॅन रोहितने अर्धशतक ठोकले ! 

भाजपचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या अधिपत्याखाली नगर अर्बन बँकेचे कामकाज सुरू झाले. त्यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळाने गैरकारभार केला होता. त्याविरोधात राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, अच्युत पिंगळे यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. या गैरकारभारची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानुसार शहराच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, कर्ज प्रकरणातील गैरव्यवहार, तसेच बँक शाखांतर्गत व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या एचओबीआयटी खात्यातून शेळके याच्या खात्यात रकमा वर्ग झाल्याचं फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झालं. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.

तेव्हा पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने ड्रग्जच्या घटना सुरु होत्या, अजित पवार गटाकडून खळबळजनक आरोप 

डॉ. निलेश शेळके याला यापूर्वी देखील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करून अटक केली होती. या प्रकरणात त्याचा कर्जामध्ये सहभाग होता. त्याने बनावट कागदपत्रे तयार करत तसेच इतर लोकांना हातशी धरून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक घोटाळा केलेला केल्याचं फॉरेन्सिक अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहे.

दरम्यान नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी आतापर्यंत अशोक कटारिया, अनिल कोठारी राजेंद्र लुणीया, प्रदीप पाटील, सीए शंकर अदानी हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube