नगर अर्बन बँक ठेवीदारांना आनंदाची बातमी! बचाव समिती व ठेवीदार प्रतिनिधींच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank) घोटाळा चांगलाच गाजला होता. यातच या घोटाळ्यावरून दिवंगत खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांच्यावर देखील खूप टीका झाली होती. दरम्यान आता या बॅंकेच्या ठेवीदारांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण बँक बचाव समिती व ठेवीदार प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले आहेत.
मॅट्रिमोनियल साईट अन् वधू-वर सूचक मंडळांमार्फत लव जिहाद; पुण्यात भाजप नेत्याकडून पोलखोल
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, बँकेचे आवसायक गणेश गायकवाड, बँक बचाव समिती व ठेवीदार प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले. या संदर्भात बँक बचाव समितीच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यामुळे आता या बॅंकेच्या ठेवीदारांनी सुटकेचा नि: श्वास टाकला आहे.
नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा मोठा घोटाळा काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. बँकेच्या आजी-माजी संचालकांनी ही बँक दिवाळखोरीत नेऊन ठेवल्याचा आरोप देखील ठेवीदारांनी केला. तसेच बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी व राजेंद्र चोपडा यांनी बँकेच्या झालेल्या कारभाराबद्दल थेट आरबीआय तसेच केंद्र सरकारकडे तक्रारी केल्या होत्या. आरबीआयने कारवाईचा बडगा उगारत थेट बँकेचा परवाना रद्द केला आहे.
करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी नगर अर्बन बँकेच्या कर्ज प्रकरणाची फसवणूक केल्याप्रकरणी नगर येथील डॉक्टर निलेश शेळके याला अखेर आर्थिक गुन्हे विभागाच्या पथकाने अटक केली होती. कर्ज प्रकरणातील गैरव्यवहार, तसेच बँक शाखांतर्गत व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या एचओबीआयटी खात्यातून शेळके याच्या खात्यात रकमा वर्ग झाल्याचं फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झालं. त्यामुळे त्याला पुन्हा अटक केली होती.