नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी दाेन संचालकांना अटक

नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी दाेन संचालकांना अटक

Ahmednagar News : नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी (Nagar Urban Bank Scam) आर्थिक गुन्हे शाखेने आज माेठी कारवाई केली. त्यात नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक तथा नगर महापालिकेचे माजी नगरसेवक मनेष साठे व अनिल काेठारी यांंना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. उर्वरित संचालक अटकेच्या भीतीने पसार झाले असल्याचे समजते आहे.

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सोडला कॉंग्रेसचा हात, कर्नाटकात भाजपकडून मोठा धक्का

११३ वर्षांची परंपरा असलेली नगरच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाची बँक असलेल्या नगर अर्बन बँक अवसायनात निघाली आहे. १ हजार ३०० कोटी रुपयांपैकी तब्बल ९०० कोटी रुपये ठेवीदारांना मिळवून देण्याचं काम गेल्या काही वर्षांत झाले आहे. मात्र हा घोटाळा करणारा आणि व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असलेला मुख्य आरोपी पोलिसांनी ताब्यात घेण्याऐवजी सोडून दिल्याचा आरोप ठेवीदारांकडून होत आहे.

Digpal Lanjekar: दिग्पाल लांजेकरांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट शूटिंगचे ‘चॅलेेंज’ पूर्ण

त्यामुळे संबंधित ठेवीदारांनी मंगळवारी (ता. २३) नगरच्या न्यायालयात धाव घेतली. नगर अर्बन सहकारी बँकेतील कर्ज गैरव्यवहार व आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Assembly Elections : शेवगाव-पाथर्डीत भाजप विजयी हॅट्रिक करणार की राष्ट्रवादीची वेळ येणार?

आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे. बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट झालेले आहे. या संदर्भातील अहवाल मागील महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. यात हा घोटाळ्याचा आकडा २९१ कोटीच्या वर गेल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया व प्रदीप जगन्नाथ पाटील या दोघांना अटक केली होती.

दरम्यान, दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. एसआयटीने नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी पहिल्यांदाच तत्कालीन संचालकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. एसआयटीने आज तत्कालीन संचालक मनेष साठे व अनिल कोठारी यांना ताब्यात घेतले आहे. मनेष साठे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube