Download App

‘जयंत पाटील शेवटचा डाव आखणार..,’;’दिल्लीसुद्धा पवारांना घाबरते’ म्हणणाऱ्यांना विखेंचा मार्मिक टोला

Sujay Vikhe Patil On Jayant Patil : मागील काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतरचा नंबर कोणाचा? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.अशातच जयंत पाटलांनी दिल्ली सुद्धा पवारांच्या नावाने घाबरते असं ट्विट यांनी केलं आहे. पवार यांनी एक डाव पाठीमागे ठेवला असं देखील पाटील म्हणाले आहेत. त्यावर खासदार सुजय विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पाटील (Jayant Patil) तिकडे किती दिवस थांबणार हेच आधी त्यांना विचारा ते शेवटचा डाव ते आखतील, असा मार्मिक टोला यावेळी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी लगावला आहे.

‘अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर सरकार टिकलं नसतं’; तटकरेंनी आव्हाडांना सुनावलं

आगामी लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येऊ घातल्या आहेत, तसंतसं राज्यातील वातावरण चांगलच तापू लागलं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. तर सत्ताधाऱ्यांकडूनही टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशातच आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका करताच सुजय विखेंनी जयंत पाटलांनंतर पवारांचाही समाचार घेतला आहे.

विरोधकांनी जे केलं तसंच इतरही करतील असं वाटत असून आम्ही जसं वागलो तसेच सगळेजण आहेत., मात्र तसं नसतं राजकारणात प्रत्येक जण वेगळा वेगळा असतो, नेत्यांचा वापर करुन सोडायचं हे भाजपात होत नसल्याचं सुजय विखेंनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप शिंदे गट व अजित पवार गटाला सोडून देतील फक्त निवडणुकीपुरता त्यांचा वापर केला जातोय अशी टीका रोहित पवार यांनी केली होती.

Pratija : दगडूला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजु भेटली; पाहा प्रथमेश-क्षितिजाचे प्री वेडिंग

यावेळी बोलताना सुजय विखे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही नेम धरत निशाणा साधला आहे. पक्षाचे नेते किती कोटीच्या गाडीमध्ये फिरतात तसेच जे हेलिकॉप्टर वापरतात त्याचे पैसे कोठून येतात. या सगळ्या गोष्टीचे उत्तर त्यांनाही द्यावं लागणार आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये, असं आव्हान देखील यावेळी खासदार विखे यांनी केलं. संजय राऊत यांचे नेते कुठल्याही उत्पन्नाचं साधन नसताना कोविड सेंटरच्या पैशातून आज जे गाड्या बंगले घेतले आहेत, अशांनी यासंदर्भात टीका करणे योग्य नसल्याचं खासदार सुजय विखे म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपचे नेते आणि निवडणूक प्रचार काळामध्ये महागड्या गाड्या घड्याळ आधी वापरू नये अशा सूचना पक्षाचे वरिष्ठांनी केले यावरती संजय राऊत यांनी टीका केली जनतेच्या पैशातूनच हे सगळं सुरू आहे अशी टीका राऊत यांनी केली होती.

follow us