Download App

अहिल्यादेवींच्या भूमीत राजकारण करणाऱ्यांची माती झाल्याचं पाहिलंय; पडळकर बरसले

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या भूमीत राजकारण करणाऱ्यांची माती झाल्याचं डोळ्यांनी पाहिलं असल्याचं म्हणत गोपीचंद पडळकर बरसले आहेत. अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Gopichand Padalkar News : पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या (Punyashlok Ahilyadevi Holkar) भूमीत राजकारण कुणी करायचं नाही, राजकारण करणाऱ्यांची माती झाल्याचं मी डोळ्यांनी पाहिलं असल्याचं म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) विरोधकांवर बरसले आहेत. दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त जामखेडमधील चौंडीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदी नेतेमंडळी उपस्थित होते.

PM मोदींची विवेकानंद शिलान्यास येथे ध्यानधारणा सुरू; कसे असतील पुढचे 45 तास? पाहा फोटो

पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यभूमीत कोणीही राजकारण करायचं नाही, अहिल्यादेवींच्या पुण्यभूमीत राजकारण करणाऱ्यांची माती झाल्याचं मी अनेकदा डोळ्यांनी पाहिलं आहे. कोणाचं नाव टाकलं कोणाचं नाही हे पाहायचं नाही. आपण अहिल्यादेवी भक्त म्हणून येऊन खाली बसायची तयारी ठेवली पाहिजे, असंही पडळकरांनी स्पष्ट केलंय.

पडळकरांचं रक्त प्रस्थापितांच्या छाताडावर नाचणार :
चौंडी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यभूमी असून इथं राजकारण कुणीही करायचं नाही. राजकारण करणाऱ्यांची माती झाल्याचं मी डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे कुणाचंही नाव टाकलं किंवा नाही टाकलं तरीही अहिल्याभक्त म्हणून येऊन खाली बसण्याची तयारी ठेवावी, राजकारणाला आपल्याकडे 364 दिवस शिल्लक आहेत. चिंता करु नका, पडळकरांचं रक्त प्रस्थापितांच्या छाताडावर नाचणार आहे, आपल्या लोकांविरोधात काहीही करणार नसल्याचं गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट केलंय.

कॅन्सरपासून हृदयापर्यंत आजारांचा धोका, धूम्रपान टाळा; जाणून घ्या तंबाखू विरोधी दिनाचं महत्व..

तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीवर न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिलायं. या निकालाविरोधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही नाही काही मार्ग काढतील, असा आम्हाला विश्वास आहे. आरक्षणाच्या मागणीसंदर्भात पुर्नविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे, त्यावेळी सरकारने आमच्या पाठिशी ठामपणे उभं रहावं, असं साकडंही गोपीचंद पडळकरांनी शिंदे-फडणवीसांना घातलंय.

दरम्यान, अहिल्यादेवी होळकरांनी एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन राज्यकारभार केला आहे, शालेय अभ्यासक्रमात अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराचे धडे देण्यात यावेत, अशीही मागणी यावेळी गोपीचंद पडळकरांनी केलीयं.

follow us