Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सकल मराठा समाज बांधव दिवसेंदिवस अत्यंत आक्रमक होऊ लागला आहे. यातच आरक्षणासाठी अनेकांकडून टोकाचे पाऊल उचलले जाऊ लागले आहे. नुकतेच नेवासा तालुक्यात एकाने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज संगमनेरात एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
चिठ्ठी लिहित या तरुणाने घेतला गळफास
सागर भाऊसाहेब वाळे (वय २७, रा. झोळे, ता. संगमनेर, जि. अ.नगर) असे मयत तरुणाचे नाव असून मरणापूर्वी त्याने एक सुसाईट नोट लिहिली होती. आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. यात कोणाला जबाबदार धरु नये, आपला लाख मराठा सागर अशी चिठ्ठी लिहित या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
‘सरकारला आपली मागणी मान्य करावीच लागेल’; शाहू महाराज छत्रपतींनी घेतली जरांगेंची भेट
याबाबत अधिक माहिती अशी, उच्चशिक्षित असलेला सागर हा संगमनेर तालुक्यातील झोळे या गावचा रहिवासी होता. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री जेवण करून आपल्या घरी झोपला होता मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळेना यामुळे व्यथित झालेला सागरने थेट टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
काय आहे सुसाईड नोट?
सागरने आत्महत्या का करत आहे याबाबतची एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने म्हंटले एक मराठा लाख मराठा… आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. एक मराठा लाख मराठा. आपला लाडका सागर मराठा, असा उल्लेख चिठ्ठीत केलेला आहे.
Priyanshu Panuli: प्रियांशू पैन्युलीने त्याच्या आगामी प्रोजेक्ट’ची शेअर केली एक झलक
घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये त्याने आत्महत्या केली. सकाळी त्याच्या पालकांनी उठून पाहिले तेव्हा एका पडवित सागरचा मृतदेह छताला लटकताना दिसला. तर, शेजारी एक चिठ्ठी देखील दिसली. त्यानंतर सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली असता त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई केली. तर, आज सकाळी याच्यावर झोळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.