Download App

परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळण्याची राहुल गांधींना हौस, विखेंचा हल्लाबोल

राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे. - मंत्री विखे

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe Patil : जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी कॉंग्रेस आरक्षण (Reservation) संपण्याचा विचार करेल, पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं वक्तव्य कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) एका कार्यक्रमात केलं. त्यावरून महायुतीच्या नेत्यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

“३४ वर्ष उलटली पण मला काही पुरस्कार मिळेना”; अजितदादांचा रोख कुणाकडे? 

राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे, त्यांच्या वक्तव्याने कॉंग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भाताील खोटेपणा लोकांच्या समोर आला, अशी टीका विखेंनी केली.

विखे पाटलांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत बोलतांना ते म्हणाले की, परदेशात गेल्यानंतर राहुल गांधींवर तिथल्या वातावरणाचा परिणाम होतो, त्यातून असे वक्तव्य करण्याचे शहाणपण त्यांना सुचत असल्याचा टोला विखेंनी लगावला. त्यांना परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळण्याची हौस आहे. पण, आपण काय बोलतो याचे भानही त्यांना राहत नाही, यापूर्वी भारतीय लोकशाहीच्या विरोधातील वक्तव्य असो की, संसदेत त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानांच्या कालावधीत अध्यादेश फाडण्याची राहुल गांधींची भूमिका म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अवमान करणारीच होती, असा आरोप विखेंनी केला.

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचा बहारदार ट्रेडिशनल अंदाज 

पुढं ते म्हणाले, आता थेट आरक्षण रद्द करण्याच्या त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसची दुतोंडी भूमिका उघड झाली. लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह पसरवून दिशाभूल करणारे चेहरे जनतेला समजले असल्याकडे लक्ष देऊन राहुल गांधीचे वक्तव्य संविधानाचा अपमान करणारे आणि जनतेचे हक्क, अधिकार हिरावून घेणारे आहे, असं विखे म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने नेहमीच संविधानाचा आदर केला. भापज आरक्षण रद्द होवू देणार नाही, पण कॉंग्रेसने नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. त्यामुळे राहूल गांधीची भाषा आणि काँग्रेसची आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका संविधान बदलाची असल्याचे आता लपून राहीलेले नाही, असं विखे पाटील यांनी सांगितले.

follow us