“३४ वर्ष उलटली पण मला काही पुरस्कार मिळेना”; अजितदादांचा रोख कुणाकडे?
Ajit Pawar : ‘दिलीपराव मोहिते पाटील यांना उत्कृष्ट वक्तृत्वाबद्दल सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला. मला मात्र 34 वर्ष झाली तरीही मला काही सर्वोत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळाला नाही. मला उत्कृष्ट संसदपटू मिळाला नाही. आता काहीच कळेना. मलाही काही सुधारणा सांगा. भाषणात बदल सांगा म्हणजे मलाही पुरस्कार मिळेल. सभागृहात मी बोलावं म्हणजे मी सुद्धा उत्कृष्ट संसदपटू होईल, असं कुणी सांगत नाही’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार सुप्रिया सुळेंना खोचक टोला (Supriya Sule) लगावला.
Ajit Pawar: ..आता विधानसभेला दादांना पाडायचंय का?, गब्बरच्या ‘त्या’ पत्रामुळे बारामतीत खळबळ
अजित पवार आज खेळ आळंदीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांचा नामोल्लेख टाळत खोचक शब्दांत टीका केली. तसेच आमदार दिलीप मोहिते यांचे कौतुक केले. अजित पवार पुढे म्हणाले, दिलीपराव मोहितेंना मदत करता आली कारण मी राज्याचा अर्थमंत्री होतो. ते मागणी करायचे आणि मी मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावायचो.
2019 ते 2024 या टर्मचा विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या (Draupadi Murmu) हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचं कौतुक झालंय. मी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. पुरस्कार त्यांनी जनतेला अर्पण केला हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.
आता भावनिक होऊ नका..
लवकरच मेट्रो चाकण, वाघोली आणि सासवडपर्यंत नेणार असल्याचा शब्द देत तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त आशीर्वाद आणि भरभक्कम पाठिंबा द्या. भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो भावनिक होऊ नका. इतके दिवस इतरांना प्रेम आणि आधार दिला आता काहीदिवस आम्हाला द्या, असे म्हणत आम्ही काही चुकीचे करणार नाही. पण आम्ही काही चुकलो तर आमचा कान पकडून जाब विचार तो तुमचा अधिकार आहे.
CNG : गणेशोत्सवातच नागरिकांच्या खिशाला झळ; पुणे, पिंपरीमध्ये CNG महागला, काय आहेत नवे दर?
पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सांगितले की, मला सात पोलीस स्टेशन पाहिजे. मी काल (दि.11) त्यांची सात पोलीस स्टेशन मान्य केली. पिंपरीचे आयुक्त चौबेंनी सांगितले की, मला चार पोलीस स्टेशन हवे आहेत. त्यांना मागणीनुसार त्यांच्या हद्दीत चार पोलीस स्टेशन मान्य केल्याचे अजित पवारांना सांगितले.