Download App

..तर मग सत्तेतून बाहेर काढलं तरी पर्वा नाही; बच्चू कडूंचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर

Bachchu Kadu : मराठा आरक्षण आंदोलनात कधी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि सरकार यांच्यात मध्यस्थी करताना तर कधी आंदोलकांच्या बाजूने मैदानात उतरलेले आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सर्वांनी पाहिले. सरकारविरोधात भूमिका घेत त्यांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. आताही पुन्हा त्यांनी सरकारला कठोर शब्दांत फटकारलं आहे. बच्चू कडू यांनी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पंतप्रधान आवास योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला.

कडू म्हणाले, या योजनेत सरकारकडून मागेल त्याला घर आणि अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. पण तीच योजना गावात अटी घालून फक्त सव्वा लाखांत दिली जात आहे. हा अपमान आहे. अशा फाटक्या घराला मोदींचं पोस्टर लावलं हा असा अन्याय का, असा सवाल आमदार कडू यांनी उपस्थित केला.

Bachchu Kadu : भविष्यात भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकतात; कडूंच्या वक्तव्याने खळबळ!

राज्यात सरकारमध्ये आहोत याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. लोकशाहीत अशी विषमता केली जात असेल तर ती आम्ही स्पष्टपणे मांडू. आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालेल त्याची पर्वा आम्ही कधीच करत नाही. आम्ही स्वतःहून काही सरकारमध्ये गेलो नव्हतो त्यांचेच फोन आले होते, असा खुलासा कडू यांनी केला.

follow us