Download App

Ahmednagar : ‘थोडं थांबा, लवकरच ‘मविआ’ सरकार येणार’; राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा

Ahmednagar News : महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे गट बाहेर पडल्याने माविआचे सरकार कोसळले व राज्यात शिंदे फडणवीसांचे महायुतीचे सरकार स्थापन झाले. विरोधक असल्याने निधीची कमतरता बसू लागली मात्र काळजी नसावी येथे आठ ते दहा महिन्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असे मोठे भाकित राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkt Tanpure) यांनी केले. निधी वाटपावरून देखील यावेळी तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, आमदार तनपुरे यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की विकासकामांसाठी निधीची आवश्यकता आहे मात्र हे सरकार काही घड्याळाचे चिन्ह असलेल्यांना निधी देण्याची इच्छा सरकारची नाही. तसेच आम्ही निधीची मागणी केली तरी काही मिळत नाही मात्र याची काळजी नसावी कारण येत्या आठ ते दहा महिन्यांमध्ये पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.

कुणाची सुपारी घेऊन ‘बारसू’ला विरोध करता ? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना जळजळीत सवाल !

तसेच पुढे बोलताना तनपुरे म्हणाले की, थोडं थांबव लागेल मात्र आपल्या सरकार आले की निधीची कमतरता भासणार नाही आपले सरकार येणार यासाठी कुठल्याही ज्योतिषाची पण गरज नाही असे देखील तनपुरे म्हणाले. रखडलेल्या विकासकामांसाठी मी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला मात्र विरोधी पक्षातील आमदारांना हे सरकार काही केल्या निधी देत नाही असा हल्लाबोल देखील तनपुरे यांनी मंचावरूनच सरकारवर केला.

follow us