Sunil Tatkare on Narhari Zirwal : विधानसभेला जास्तीत जागा जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे राज्याचा दौरा करत आहेत. त्यातून कार्यकर्ता मेळावा, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्यात काही आमदार हे पुन्हा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे येणार असल्याचा राजकीय चर्चा आहेत. त्यात अजित पवार गटाचे परभणीचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते बाबाजानी दुर्रानी शरद पवार गटात आले आहे. तर आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे राजकारणात चर्चा सुरू होत्या. आज मात्र खासदार सुनील तटकरे यांनी थेट झिरवळांची उमेदवारीच जाहीर करत या चर्चांना पूर्णविराम दिला.
नरहरी झिरवळांच्या मनातही चलबिचल ? सुनील तटकरेंच्या महत्त्वाच्या बैठकीलाच मारली दांडी
नाशिक येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात आयोजित जनसन्मान यात्रेत तटकरे यांनी मोठा खुलासा केला. विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातू नरहरी झिरवाळ हेच महायुतीचे उमेदवार असतील. त्यांच्याबाबत आता ज्या चर्चा होत आहेत त्या निरर्थक आहेत. झिरवाळ अजित पवारांसोबत आहेत असे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यात नाशिकमध्ये कोणत्या जागा आपल्या मिळतील? किती जागा घेतल्या पाहिजे? यावर चर्चा झाली. परंतु या महत्त्वाच्या बैठकीला नरहरी झिरवळ हे गैरहजर होते. तेही शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे चर्चा आहे. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास तो अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असू शकतो. यानंतर पत्रकारांशी बोलताना मी आज, उद्या आणि शेवटपर्यंत अजित पवार यांच्या सोबतच राहणार असं त्यांनी स्पष्ट केले होते.
मी त्याचा बाप आहे, मुलाच्या वेगळ्या हालचाली दिसताच झिरवळांनी ठणकावलं
काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ (Gokul Zirwal ) यांनी मी काहीही झालं तर शरद पवार यांच्यासोबत राहणार अशी प्रतिक्रिया दिली होती त्यावर देखील नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली. त्याची चिंता नका करू. ते माझं पोरगं आहे. मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही, असं झिरवाळ म्हणाले. तो सत्कार करून पुढे जाणार होता म्हणून मी त्याला जाब विचारला. सांगायचं इकडे आणि जायचं तिकडे अशातले आम्ही नाही मात्र तो कुठेच वावगा बोलला नाही याचा मला अभिमान आहे.