Download App

जिहादींच्या बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करा; आ. संग्राम जगतापांचा मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या

शहरातील बेकायदा बांधकाम, अतिक्रमणांविरोधात कारवाई करा, या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं

  • Written By: Last Updated:

Sangram Jagtap : गेल्या काही दिवसांपासून शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात Illegal encroachment) आमदार संग्राम जगता (Sangram Jagtap चांगलेच आक्रमक झालेत. आजही शहरातील बेकायदा बांधकाम, अतिक्रमणे तसेच निवासी बांग्लादेशी रोहिंग्यांवरील कारवाईबाबत आमदार संग्राम जगताप यांनी महानगरपालिका (Ahmendagar Mahapalika) आयुक्तांच्या दालनात एक तासाहून अधिक काळ ठिय्या आंदोलन केलं. सावेडी उपनगरमध्ये काही जिहादी लोकांनी बेकायदा अतिक्रमणे केली, ही अतिक्रमणे हटवण्याची मागणी जगताप यांनी केली.

हिंदू गर्जना चषक : कोल्हापुरच्या शुभम शिदनाळे, अपेक्षा पाटील, हवेलीच्या सुरज चोरघे यांना विजेतेपद 

जिहादी लोकांनी केलेले अतिक्रमण हटवले नाही तर आम्ही कायदा घेऊ, असा इशारा देखील संग्राम जगताप यांनी दिला.

अहिल्यानगर उपनगरातील अनेक परिसरात बांग्लादेशी नागरिक तसेच जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून अनधिकृत अतिक्रमणे करून जागा बळकविण्याचे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. याविरोधात आज आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीने मनपा आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलतांना संग्राम जगपाप म्हणाले की, मनपा आयुक्तांच्या दालनात आम्ही एका तासापासून आंदोलन करतोय. पारिजात चौकातील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. पारिजात चौकात पत्र्याचे गाळे टाकून काही जिहादी लोकांनी अतिक्रमणे केली. हिंदू लोक येऊ नये, यासाठी तिथं जिहादी लोकांनी पत्र्याचे गाळे टाकून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलंय. पारिजात चौकातील काही परिसर देवाच्या नावावर होता. त्या परिसारत दोन-तिन घरं होती. आता तिथं मोठ्या प्रमाणावर जिहादींनी कब्जा केला असून तिथं हिंदूंची संख्या बोटांवर मोजण्या इतकीच आहे, असं जगताप म्हणाले.

… तेव्हा मुंडे साहेब वेगळा पक्ष काढणार होते, छगन भुजबळांनी सांगितला ‘तो’ किस्सा 

जिहादींचा नगरच्या वेगवेगळ्या भागात शिरकाव सुरू आहे. याबाबद आम्ही हिंदू जागृत आहोत, जिथं जिथं जिहादी शिरकाव करतील, तिथं लोकशाही मार्गाने त्यांना दाबण्याचं काम आम्ही करू, असं संग्राम जगताप म्हणाले. तसेच प्रसानसनाने सहकार्य केलं नाही, तर आम्ही हातात कायदा घेऊ, असा थेट इशाराही संग्राम जगताप यांनी दिला.

‘त्या’ सेतू चालकांवर कारवाई करावी
नगर शहरात अनेक सेतू केंद्रे हे जिहादी वृत्तीच्या सेतू चालकांकडे आहेत जे नगर शहरासह आजू बाजूच्या परिसरात बांगलादेशी रोहिंग्यांना कागदोपत्री आश्रय देत आहेत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी केली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे त्यांनी याबाबतचे निवदेन दिले.

follow us