Download App

“भुजबळांना पक्षात घेऊ नका”, ठाकरे गटातील प्रवेशाला येवल्यातूनच पहिला विरोध

भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये असा ठराव येवला मतदारसंघातील 46 गावांतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवला आहे.

Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत उठापटक सुरू आहे. या निवडणुकीत सर्वाधिक फटका भाजपलाच बसला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. अजित पवार यांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली जात आहे. अजित पवारांना महायुतीत घेतल्याने मोठा फटका बसल्याचा सूर भाजप नेत्यांचा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतही खटपट सुरू असल्याच्या चर्चा आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज (Chhagan Bhujbal) असून लवकरच ठाकरे गटात प्रवेश करतील अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. मात्र,  त्यांच्या या संभाव्य प्रवेशाला ठाकरे गटातून आतापासूनच सुरुवात झाली आहे. पहिली ठिणगी नाशकात पडली आहे.

भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये असा ठराव येवला मतदारसंघातील 46 गावांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवला आहे, अशी माहिती माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी लासलगावात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भुजबळांच्या संभाव्य शिवसेनेतील प्रवेशाला विरोध करण्यात आला.

लक्ष्मण हाके उपोषण सोडणार? छगन भुजबळांसह सहा मंत्री उपोषणास्थळी हाकेंची आज भेट घेणार

या बैठकीत छगन भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांना काय त्रास दिलाय हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊ नये अशी आमची भूमिका आहे, असे माजी आमदार पाटील यांनी सांगितले. छगन भुजबळ अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. पक्ष सोडण्याच्या चर्चांवर त्यांनी अजून तरी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पक्षात सतत डावलले जात असल्याने आता वेगळा निर्णय घ्या अशी भूमिका समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यांच्याकडून जो निर्णय घेतला जाईल त्याला आमचा पाठिंबा असेल असेही कार्यकर्त्यांनी सांगितले होते. यानंरतर भुजबळांनी अजून काही भूमिका घेतलेली नाही. लोकसभा निवडणूक त्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, या दोन्ही वेळेस त्यांचा विचार झाला नाही. त्यामुळे पक्षात भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यानंतर स्वतः छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आता छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

शिंदे-फडणवीसांसमोरच भुजबळांचा पारा चढला, म्हणाले,’सयेसोयरेची अधिसूचना काढू नका’

follow us

वेब स्टोरीज