Download App

चव्हाणांच्या राजीनाम्याचे नगरमध्ये पडसाद, काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या व्यासपीठावर

Ahmedanagar news : गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पडसाद पाहता चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे विनायक देशमुख (Vinayak Deshmukh) यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर देशमुख थेट आज भाजपाच्या एका कार्यक्रमांमध्ये दिसले. विखे व देशमुख हे एकाच व्यासपीठावर दिसल्याने देशमुख यांचा भाजपा प्रवेश होणार का? असे चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगले आहे.

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. यातच गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय पक्षातील नेते मंडळाकडून राजीनाम्याचे सत्र देखील सुरू असून पक्षांमध्ये इन्कमिंग आउटगोइंग सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेस मधून बाहेर पडत त्यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला. त्या पाठोपाठ यांचे खंदे समर्थक मानले जाणारे विनायक देशमुख यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला. देशमुख यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती होती. त्यांनी आपला पदाचा राजीनामा नाना पटोले यांच्याकडे सुपूर्त केला. नगर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यक्रमांमध्ये सुजय विखे तसेच शिवाजीराव कर्डिले यांच्या समवेत विनायक देशमुख हे देखील व्यासपीठावर दिसले. त्यानंतरच देशमुख हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार का? असे चर्चा देखील रंगल्या.

हिंदी-इंग्रजी येत नाही म्हणून बाथरुममध्ये लपायचे, आव्हाडांनी अजित पवारांना धू धू धुतले

विनायक देशमुख यांची राजकीय कारकीर्दी पाहिले असताना नगर जिल्ह्यासह त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस मधून जन्म मध्ये प्रभारी निरीक्षण समन्वयक म्हणून काम केले आहे. तसेच राजकीय नेत्यांशी त्यांचा चांगला संपर्क देखील आहे. चव्हाण बरोबरच ते विखे यांचे देखील चांगले मानले जातात त्यामुळे बाय बाय करणारे देशमुख कमळ कधी हाती घेणार याकडे नगर जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

नारायण राणेंवर मनोज जरांगे पाटील चिडले, नितेश राणे यांचा जरांगेंना थेट इशारा

भाजपामधील सर्वच नेत्यांसोबत माझा कायम स्नेह
भाजपाच्या व्यासपीठावर पोहोचलेले देशमुख यांनी यावेळी जोरदार भाषण देखील केले. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की काँग्रेसच्या व्यासपीठावर गेली 32 वर्ष मी भाषणं केली. मात्र आता त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरती भाषण करतो आहे. भाजपामधील सर्वच नेत्यांसोबत माझा कायम स्नेह राहिला आहे.

जुन्या साथीदाराकडून अखिलेश यादवांचा गेम : संजय सेठ यांची राज्यसभेच्या रणांगणात भाजपकडून ऐनवेळी एन्ट्री

विशेष म्हणजे विकी कुटुंबीयांच्या सहकार्यामुळेच तसेच त्यांच्याकडून वेळोवेळी मिळत आलेली ताकद यामुळेच आज आपण राजकारणात टिकून आहोत. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही आरएसएसमधून झाली तर आता शेवट हा भाजपामध्ये होतोय यावेळी बोलताना देशमुख यांनी म्हटले. दरम्यान त्यांचा अद्याप अधिकृत प्रवेश झाला नाही मात्र पक्ष देईल ती जबाबदारी आपण योग्यपणे पार पाडू असे म्हणत एक प्रकारे देशमुख यांनी आपण भाजपच्या वाटेवर असल्याचे देखील स्पष्ट केलं.

follow us

वेब स्टोरीज