Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank) घोटाळा चांगलाच गाजला आहे. यातच या घोटाळ्यावरून दिवंगत खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांच्यावर देखील खूप टीका झाली होती. दरम्यान बँकेचे ठेवीदार आता चांगलेच संतापले काही दिवसांपूर्वी गांधींच्या बंगल्यासमोर देखील निदर्शने केली होती. तर आज काही ठेवीदारांनी थेट नगर अर्बन बँकेत जाऊन दिवंगत माजी खासदार व बँकेचे अध्यक्ष स्व. दिलीप गांधी यांचा फोटो बाहेर काढून बँकेसमोरील चौकात चपलांचा मार देत त्यांची प्रतिमा पायांखाली तुडवली. यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा मोठा घोटाळा काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. बँकेच्या आजी-माजी संचालकांनी ही बँक दिवाळखोरीत नेऊन ठेवल्याचा आरोप देखील ठेवीदारांनी केला. तसेच बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी व राजेंद्र चोपडा यांनी बँकेच्या झालेल्या कारभाराबद्दल थेट आरबीआय तसेच केंद्र सरकारकडे तक्रारी केल्या होत्या. आरबीआयने कारवाईचा बडगा उगारत थेट बँकेचा परवाना रद्द केला आहे.
Sugar Stocks : सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे मालामाल झाले गुंतवणूकदार; 11 टक्क्यांनी वधारले 32 शेअर्स
दीडशे कोटींच्या बनावट कर्ज प्रकरणामुळे नगर अर्बन बँक अवसायानात गेली आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी अडकल्या आहे. दरम्यान आज दुपारी रोजी बँकेच्या ठेवीदारांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला.
Parliament winter session : चार दिवसांत तब्बल 92 खासदारांचे निलंबन; विरोधकांची नेमकी मागणी काय?
संतापलेल्या ठेवीदारांनी आज शहरातील लालटाकी येथे एक बैठक घेतली. यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर आक्रमक होत ठेवीदारांनी बँकेकडे मोर्चा वळविला. थेट बँकेत जाऊन बँकेचे अध्यक्ष तथा दिवंगत खासदार स्व. दिलीप गांधी यांचा भिंतीवरील फोटो काढला व त्याला बाहेरील चौकात लटकवला. संतप्त ठेवीदारांनी गांधींच्या फोटोला जोड्यांचा आहेर दिला. तर काहींनी फोटो थेट पायाखाली तुडवला.