शेतकऱ्यांचे अश्रू जास्त महत्वाचे; दीड वर्षात 44 हजार 278 कोटींची मदत : CM शिंदे

शेतकऱ्यांचे अश्रू जास्त महत्वाचे; दीड वर्षात 44 हजार 278 कोटींची मदत : CM शिंदे

CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी विधानसभेमध्ये आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या दीड वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडला. तसेच यावेळी त्यांनी सरकारसाठी शेतकऱ्यांचे अश्रू जास्त महत्त्वाचे आहेत. असे देखील अधोरेखित केलं आहे.

Rajyasabha MP Suspend : लोकसभेनंतर राज्यसभेतही मोठी कारवाई! विरोधी पक्षातील 34 खासदार निलंबित…

ते म्हणाले की, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. 32 पैकी 26 जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अवकाळीसाठी 2 हजार कोटी देय आहेत. जसे पंचनामे पूर्ण होतील तशी ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल. काही चेकचे वाटप दिले आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू जास्त महत्वाचे आहेत. त्यांची जास्त काळजी आहे. बळीराजाला 44 हजार 278 कोटी इतकी मदत दीड वर्षात दिली आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

ओन्ली राष्ट्र म्हणत मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असलेल्या विनोद तावडेंचा यू टर्न

त्याचबरोबर यावेळी शिंदे यांनी विरोधकांवर आणि विशेषतः उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले माझ्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली. पण लंडन दौऱ्यापेक्षा महाराष्ट्र दौरा चांगला आहे. त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. शेतकऱ्यांशी बोललो, घरी बसून व्हिडिओ कॉलवर बैठका नाही घेतल्या नाही. अशी टीका शिंदे यांनी केली.

चार लाख मराठे होणार ‘OBC’ : न्या. संदीप शिंदे समितीचा अंतिम अहवाल शासनाला सादर

महायुतीच्या सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांना विक्रमी मदत केली. शेतकऱ्यांना मदत मागावी लागू नये. अशी परिस्थिती निर्माण करण्याच्या गरज असते. कारण अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे विरोधकांनी आरोप करताना अगोदर आत्मचिंतन करावं. असा सल्ला देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच ते म्हणाले शेतकऱ्यांचा हा मुद्दा अधिवेशनापुरता मर्यादित नाही. असंही म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube