Download App

‘मतदान दक्षिणेतून अन् साखर उत्तरेत…’; विखेंच्या साखरेला ठाकरे गटाचा कडवा डोस

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : दिवाळीचा सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला. त्यानिमित्त अनेक पुढारी हे आपल्या मतदारसंघातील मतदारांना दिवाळीनिमित्त मोफत वस्तूचे वाटप करत असतात. खासदासुजय विखेंनी (Sujay Vikhe) देखील स्वस्त दरात खाद्य वस्तू तसेच काही दैनंदिन वस्तूचे मोफत वाटप सुरू केले. विखेंकडून नगर जिल्ह्यातील उत्तर भागातील नागरिकांना मोफत साखर वाटप सुरू आहे. हाच धागा पकडून ठाकरे गटाकडून विखेंना घेरण्यात येत आहे.

‘सत्तेसाठी पैसा अन् पैशांसाठी सत्ता..,’; प्रियंका गांधींच्या टोलेबाजीवर बावनकुळेंचं उत्तर 

मतदान तुम्हाला दक्षिणेतून चालते. खासदार विखे आपण उत्तरेची दिवाळी गोड करत असताना दक्षिणेची दिवाळी मात्र कडू करत असल्याची बोचरी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे प्रदेश उपप्रमुख आणि माजी नगरसेवक विक्रम राठो (Vikram Rathod) यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले राठोड?
नगर दक्षिण निवडणुकीत विजयी झालेल भाजपचे उमेदवार सुजय विखे हे सध्या जिल्ह्यातील उत्तरेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात साखर वाटप करत आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांनी ज्या मतदार विभागातून निवडणूक लढवून जिंकली आहे, त्या नगर दक्षिणेत त्यांच्याकडून साखर वाटणे अपेक्षित होते. मात्र, नगर दक्षिणचे खासदार उत्तरेत साखर वाटतात. तेव्हा दक्षिण नगरकरांना कडू घास देणार का, असा सवाल यावेळी राठोड यांनी केला.

मुस्लिम कुटुंबाने हिंदु धर्म स्विकारला; नगरचे जमीर शेख आता शिवराम आर्य झाले… 

याबाबत त्यांनी एक पत्रक छापले. त्यामध्ये म्हटले आहे की, भाजपच्या तिकिटावर आपण नगर दक्षिणचे खासदार म्हणून तुम्ही निवडणूक लढवली मात्र विजयी झाल्यानंतर प्रत्येक दिवाळी आपण उत्तरेतील जनतेबरोबर साजरी करता. मग नगर दक्षिणविषयी सापत्न भाव का ठेवता? असा सवाल राठोड यांनी खासदार विखेंना विचारला आहे.

सगळं काही उत्तरेला दक्षिणेसाठी काय?
देशातील सर्व नेतेमंडळी उत्तरेकडे येतात. मात्र दक्षिणेकडी त्या नेत्यांना आपल्या जात नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान असो वा गृहमंत्री हे सर्व नगरला न आणता शिर्डीला आणले गेले. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम देखील नगरच्या जिल्हा मुख्यालयात व्हायला हवा होता. मात्र, तो देखील तिकडेच साजरा केलात. समृद्धी महामार्ग आपल्या मतदार संघातून नेत असताना नगर कोपरगाव रस्ता तसाच वाऱ्यावर सोडला. आपण नगर पुणे इंट्रासिटी रेल्वेसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. निदान शिर्डी मुंबई तरी नगर पुणे मार्गे सुरु करा. कर्जत जामखेडला एमआयडीसी सुरु होऊ देण्याऐवजी आपण तिला विरोधच केलात. उलट उत्तरेला एमआयडीसी दिली. आपण नगर दक्षिण मतदार संघाला प्रधान्य दिले नाही. नगर दक्षिणेतील जनतेचा कडू घास काढण्यासाठी तरी नगरला यावे असा टोला यावेळी विक्रम राठोड यांनी लगावला आहे.

Tags

follow us