मुस्लिम कुटुंबाने हिंदु धर्म स्विकारला; नगरचे जमीर शेख आता शिवराम आर्य झाले…

मुस्लिम कुटुंबाने हिंदु धर्म स्विकारला; नगरचे जमीर शेख आता शिवराम आर्य झाले…

Chhatrapati Sambhaji Nagar : देशात सध्या हिंदु-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याच्या घटना घडत असतानाच अहमदनगरच्या मुस्लिम कुटुंबाने हिंदु धर्मात प्रवेश केल्याचं समोर आलं आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांचा(Bageshwar Baba) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) तीन दिवसीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जमीर शेख यांच्यासह कुटुंबियांनी हिंदु धर्मात प्रवेश केला आहे, खुद्द बागेश्वर बाबांच्या हस्ते त्यांनी हिंदु धर्माची दीक्षा घेतली आहे.

शरद पवारांवर टीका करणं अंगलट येणार? नामदेव जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल

जमीर शेख हे अहमदनगरमधील रहिवासी असून पेशाने मजूर आहेत. शेख यांच्या कुटुंबात लहानपणापासूनच हिंदु देव-देवतांची पूजा आराधना केली जाते. हिंदु धर्मावर त्यांची अनेक श्रद्धा आहे. एवढचं नाहीतर जमीर शेख यांनी आपल्या दोन्ही मुलींचे विवाह हिंदु पद्धतीनेच करुन दिले आहेत. बागेश्वर धाम यांचे व्हिडिओ आपण मोबाईलवर पहिले आणि आपल्यातील सनातनी जागा झाला. त्यानंतर बजरंग दलाच्या पदाधिकारी यांच्या मदतीने आपण आज इथे पोहचलाे असून, हिंदू धर्म स्वीकारला असल्याचे शेख म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray : ‘देशाची अखंडता धोक्यात राज्यकर्ते मात्र निवडणूक प्रचारात’; ठाकरे गटाची जळजळीत टीका

स्वइच्छेनेच हिंदु धर्मात प्रवेश :
लोकं आपल्या इच्छेने हिंदू धर्मात दाखल झाले असून अनेक दिवसांपूर्वी त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सहा ते सात महिने त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या इच्छा बद्दलची सर्व माहिती जाणून घेतली. अखेर त्यांना हिंदु धर्मात प्रवेश घेण्यासाठी धीरेंद्र शास्त्री यांच्याकडे नेलं असल्याचं बजरंग दलाचे अध्यक्ष कुणाल भंडारी यांनी सांगितलं आहे.

‘लाज उरली नाही, किती खालची पातळी गाठाल…’; पीएम मोदींचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

दरम्यान, हिंदु धर्माची दीक्षा घेतल्यानंतर आता जमीर शेख यांचं नाव शिवराम आर्य झाले असून त्यांच्या पत्नीचे नाव सीता आर्य तर मुलगा बलराम आणि कृष्णा असे नाव धारण करण्यात आले आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नसतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा होता. फडणवीस बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला येणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, ते वेळेअभावी येऊ शकले नाहीत. तर दुसरीकडे मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यामुळे शहरात येणारे फडणवीस जरांगे यांची भेट घेणार अशी सकाळपासून चर्चा होती. मात्र, राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पेटलेल्या वादामुळे ही भेट टाळली असल्याचंही बोललं जातंयं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube