Weather Update : राज्यात पावसाने दणक्यात कमबॅक केलं असून अनेक जिल्ह्यांना (Weather Update) झोडपून काढलं आहे. पुणे मुंबईला जोरदार (Mumbai Rains) पावसाचा तडाखा बसला आहे. हा पाऊस आणखीही काही दिवस सुरुच राहणार असल्याची चिन्हे आहेत. यातच आता हवामान विभागाने (Heavy Rain) पावसाबाबत नवा इशारा दिला आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी जोरदार (Rain Alert) पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण बांग्लादेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून येत्या 24 तासांत वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
Weather Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, सोलापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांतही जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. एकूणच पुढील तीन ते चार दिवस राज्यात पाऊस होईल अशी परिस्थिती दिसून येत आहे.
20 Aug, 7 am light to mod rains possible over #South_Konkan region during next 1,2 hrs. #Mumbai #Thane light rain fir next 2,3 hrs. #Karnataka central and North watch for some moderate to intense clouds during next 3,4 hrs.
Watch for IMD updates please pic.twitter.com/j0Po6cSuJC— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 20, 2024
दरम्यान, राज्यात पावसाने मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतली होती. काही भागात मात्र तुरळक सरी बरसत होत्या. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे.
Pune News : शिक्षणाच्या माहेरघरात एक कोटीचे अंमली पदार्थ जप्त, तीन तरुणांना अटक