Download App

OBC Reservation : विखे बाप-लेकाला आता मतदान करायचं नाही; धनगर समाज आक्रमक

  • Written By: Last Updated:

OBC Reservation : अहमदनगर राज्याचे महसूल मंत्री तसेच नगर व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर फेकलेल्या भंडाऱ्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून धनगर समाज आक्रमक झाला आहे. आपल्या मतांवर निवडणून आलेले विखे पिता पुत्रांना यापुढे मतदान करायचे नाही. त्यांना आमची मात्र चालतात मात्र भंडारा नाही अशा कडव्या शब्दांत धनगर समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध केला.

पदावर होता तेव्हाच…माजी लष्कर प्रमुखांच्या विधानाचा राऊतांकडून खरपूस समाचार

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावामध्ये धनगर समाजातील काहींनी विखेंच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, त्यांना आपली मते चालतात मात्र त्यांना आपला पिवळा भंडारा चालत नाही, आज ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी भंडारा आम्ही इतरांना लावतो मात्र यांना तो सहन झाला नाही. त्यामुळे आता समाज बांधवांनी या विखे पिता पुत्रांना मतदान करायचे नाही हे सुद्धा लक्षात ठेवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Diesel Vehicles महागणार! 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याची गडकरींची अर्थ मंत्रालयाकडे मागणी

काय आहे नेमकं प्रकरण?

सोलापुरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आढावा बैठकीसाठी सोलापुरात गेले होते. त्याचवेळी धनगर आंदोलक शेखर बंगाळे हे विखे पाटलांना आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी आले होते. त्याचवेळी बंगाळे यांनी विखे पाटलांवर भंडारा उधळल्याची घटना घडली होती. त्यानंतर विखेंच्या सुरक्षा रक्षकांनी बंगाळे याला मारहाण केल्याचं दिसून आलं होतं. याच मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाला आहे.

भंडारा उधळल्यानंतर विखे पाटलांनी केलं स्पष्ट…

धनगर आरक्षणाचा प्रश्न चर्चा करुन सोडवणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी(Radhakrushna Vikhe Patil) स्पष्ट केलं आहे. मंत्री विखे पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर असून याचं दौऱ्यादरम्यान, धनगर आरक्षण आंदोलकाने त्यांच्यावर निवेदन सादर करुन भंडाऱ्याची उधळण केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याचदरम्यान बोलताना हा प्रश्न आपण चर्चा करुन सोडवणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us