Download App

‘माझा दरवाजा खुला…’, मैत्री दिनाच्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांचं सूचक ट्विट

Prakash Ambedkar News : ‘माझा दरवाजा खुला…’, मैत्री दिनाच्या दिवशीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्विट केलं आहे. मागील काही दिवसांपासून विरोधकांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यावर भर दिला आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्विट देऊन युतीसाठीच संकेत दिल्याचं मानल जात आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आंबेडकरांच्या ट्विटची चर्चा रंगली आहे.

प्रकाश आंबेडकर ट्विटमध्ये म्हणाले, “पुण्यातील सुंदर, हवेशीर #SundayMorning — लोकांना भेटण्यासाठी आणि मैत्री निर्माण करण्यासाठी एक योग्य दिवस. माझे दार उघडे आहे.” असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे भाजप सोडून इतर पक्षांना आपले दरवाजे कायम खुले असल्याचे संकेतच त्यांनी दिल्याचं मानलं जात आहे.

मणिपूर, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; राऊतांच्या गंभीर आरोपांनी खळबळ!

भाजपविरोधातील विरोधी पक्षांकडून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. नूकतीच बैंगलोरमध्ये काँग्रेससह समविचारी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षाला इंडिया असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर आता आगामी निवडणुकीत इंडिया विरुद्ध एनडीए अशी चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जातंय. मात्र, प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी पक्षाने आपली युती कोणाशी? हे अद्याप स्पष्ट केलंलं नाही. अशातच आंबेडकरांनी आज केलेल्या ट्विटमुळे चर्चा रंगली आहे.

Hariyana Violence : नूहमध्ये कर्फ्यूमध्ये तीन तासांची शिथिलता पण इंटरनेट…

काही दिवसांपूर्वीच आंबेडकरांनी शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वंचितची शिवसेनेसोबत युती होणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं होतं. त्यानंतर अद्याप ही युती झाली की नाही? हे अस्पष्टच आहे.

भाजप खासदाराला दोन वर्षांची शिक्षा, खासदारकी जाऊ शकते

याचदरम्यान, युतीसंदर्भात आंबेडकरांनी मोठं विधान केलं होतं. शिवसेनेसोबत युती होऊ शकते पण राष्ट्रवादीसोबत होणार नसल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर अद्याप उद्धव ठाकरेंसह प्रकाश आंबेडकरांकडून युतीची घोषणा करण्यात आल्याचं दिसून आलं नाही.

दरम्यान, आता प्रकाश आंबेडकरांनी संकेत दिल्यानंतर विरोधी पक्षाकडून प्रकाश आंबेडकरांशी युतीबाबत चर्चा करणार की नाही? आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित कोणाबरोबर जाणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Tags

follow us