Download App

‘केंद्रा’कडून महाराष्ट्राला बरबाद करण्याचा डाव; नाना पटोलेंचा मोदींवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra)आणि मुंबईबद्दल (Mumbai)केंद्रातील (भाजप) सरकारला कायम आकस राहिला आहे. मुंबईसह महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा विडाच केंद्र सरकारने (Central Government)उचलला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Sarkar)आल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राचे नुकसान करण्यात आले, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केला आहे. आता मुंबईतीमधील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय (Textile Commissioner Office)दिल्लीला (Delhi) हलवण्याचा निर्णय घेतला आहे. हे जाणीवपूर्वक केले जात असून महाराष्ट्राला बरबाद करण्याच्या भाजपाच्या धोरणचाच भाग असल्याची घणाघाती टीका नाना पटोलेंनी केली आहे.

पटोले म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे व जागतिक पातळीवरचे महत्वाचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व येथील पोषक वातावरण लक्षात घेऊन जगभरातून गुंतवणूक येत असते. औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना होऊ शकते अटक… जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मागील काही वर्षापासून प्रयत्न सुरु आहे. शिंदे सरकार आल्यानंतर वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क आणि आता टाटा एअरबस हे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. याआधी फडणवीस सरकार असताना मुंबईतल्या ‘बीकेसी’मध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातमधल्या गांधीनगरला हलवण्यात आले.

पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचे ऑफिस दिल्लीला हलवले, नॅशनल मरीन पोलीस अकादमी पालघरहून गुजरातमधल्या द्वारकाला हलवण्यात आली. मुंबईमध्ये हिऱ्यांचा मोठा उद्योग पंचरत्न बिल्डिंगमध्ये होता यातील एक मोठा गट गुजरातला गेला. मुंबई व राज्यातील महत्वाची कार्यालये व प्रकल्प दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्याबाहेर स्थलांतरीत करण्यात आलेली आहेत. मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून ती उद्ध्वस्त करण्याचा भाजपाचा डाव आहे.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी, निरव मोदी, मेहुलभाईसारख्या उद्योगपती मित्रोंसाठीच काम करतात देशातील 140 कोटी जनतेसाठी नाही हे आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत, हे सरकारच ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे. एकीकडे राहुल गांधी देशाची लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

जनतेचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारत आहेत पण मोदी सरकार मात्र त्यांना काहीही करून अडवण्याचा प्रयत्न करत आहे. भ्रष्ट उद्योगपतींना मात्र अभय दिले जात आहे. चोर सोडून सन्याशाला फाशी, या म्हणीसारखा मोदी सरकारचा कारभार आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Tags

follow us