Female Students Molested In Jalna Sports Academy : जालना (Jalna) शहरातील क्रीडा प्रबोधिनीतून एक मोठी बातमी समोर (Jalna Sports Academy) आली आहे. एका क्रीडा शिक्षकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार (Crime News) उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकावर विनयभंग आणि पॉक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
शहरातील क्रीडा प्रबोधिनीत ग्रामीण भागातील मुलींना निवासी स्वरूपात क्रीडा शिक्षण दिलं जातं. या संस्थेत प्रमोद खरात नावाचा क्रीडा शिक्षक व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना (Female Students Molested) मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, या शिक्षकाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केलं जात असल्याचं समजल्यावर तपास सुरु करण्यात आला.
Video : भारत माझा मित्र, माझ्या विनंतीवरुन युद्ध थांबवलं, ट्रम्प यांचा पुन्हा दावा
विनयभंग, लैंगिक छळ, आणि पोक्सो
शिक्षण विभागानेही तत्काळ चौकशी केली. शनिवारी यासंदर्भात गट शिक्षणाधिकारी आणि पोलिसांनी एकत्रितरित्या विद्यार्थिनींची जबाबदारीने चौकशी केली. सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी विद्यार्थिनींचे जबाब घेतल्यानंतर आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे दोष सिद्ध झाले. त्यावरून गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद खरात याच्यावर विनयभंग, लैंगिक छळ, आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकारला मोठा झटका; आंबेडकर यांची पोस्ट करत माहिती
शिक्षकाच्या गैरवर्तनाची कबुली
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली.
गोपनीय माहितीच्या आधारे चौकशी केली असता, पीडित मुलींनी स्पष्टपणे शिक्षकाच्या गैरवर्तनाची कबुली दिली. त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया जालना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.
या घटनेने जालन्यात एकच खळबळ उडाली आहे. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारांच्या संदर्भात शाळा प्रशासन व शिक्षण विभागाने अधिक जबाबदारीने पावलं उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.