मुंबई : उद्धव ठाकरेंचं आजच्या सभेतलं भाषण वैफल्यग्रस्त असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड पचवू शकत नसल्याची टीका भाजपचे नेते आणि आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार टीका केलीय. या टीकेला प्रविण दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
कितीही ‘गौरवयात्रा’ काढल्या तरी.., वज्रमूठ सभेतून काँग्रेस नेत्याचा इशारा
दरेकर म्हणाले, हिंदुत्वाची भूमिका मांडताना हे मी अजूनही हिंदुत्व सोडलं नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात पण ज्यावेळी सोनिया गांधींच्या मांडीला मांडी लावून बसलात त्याचवेळी तुम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं आहे. अखेर बाळासाहेबांनीच स्पष्ट केलं होतं की, ज्या दिवशी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ येईल तेव्हा मी शिवसेना पक्षाचं दुकान बंद करेल. उद्धव साहेब हाच बाळासाहेबांचा विचार होता का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
इम्रान खानच्या दाव्याने खळबळ ! म्हणाले, माजी लष्करप्रमुखांनी भारताबरोबर..
तसेच माणसं मोठी करणारी लोकंसोबत आहेत मोठी झालेली गेली असं ठाकरेंनी सांगितलं पण उद्धव ठाकरेंनी एका शिवसैनिकाला किंवा एकनाथ शिंदे यांना त्याचवेळी मुख्यमंत्री केलं नाही, याउलट स्वत:कडे पद घेऊन मुलालाही मंत्री केलं असल्याचं दरेकरांनी म्हंटलयं.
सभेच्या पोस्टरवर राहुल गांधींचा फोटो का नाही ? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितले
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रक्कमेची तुलना करुन पहा, तुम्हाला समजेल देवेंद्रजींनी शेतकऱ्यांना काय दिलंय. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत विम्याची तरतूद फडणवीसांनी केल्याचं त्यांनी सांगितलंय.
उद्धव ठाकरेंकडून वारंवार गद्दार असा उल्लेख केला जात आहे. पण मागील निवडणुकांमध्ये भाजपशी युती करुनच एवढ्या जागा शिवसेनेने निवडून आणल्या आहेत. ती मतं भाजप सेनेची आहेत. जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीविरोधात भाजप-सेनेला मतदान केलं होतं. पण तुम्ही सत्तेसाठी भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडील लावून सत्तेत बसलात मग गद्दार कोण आहे? असा सवालही त्यांनी यावेळी ठाकरेंना केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपसी युती केली होती पण त्यांनी महाविकास आघाडीसरकार स्थापन करुन जनतेने दिलेल्या मतदानाचा द्रोह केला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.