कितीही ‘गौरवयात्रा’ काढल्या तरी.., वज्रमूठ सभेतून काँग्रेस नेत्याचा इशारा

कितीही ‘गौरवयात्रा’ काढल्या तरी.., वज्रमूठ सभेतून काँग्रेस नेत्याचा इशारा

छ. संभाजीनगर : आजची विराटसभा पाहिल्यानंतर तुम्ही कितीही गौरवयात्रा काढल्या तर आम्हाला काहीही फरक पडणार नसल्याचं थेट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी विधान शिंदे-फडणवीस सरकारला उद्देशून केलंय. आज छत्रपती संभाजीनगरमधील मराठा सांस्कृतिक मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेत अशोक चव्हाण बोलत आहेत. सभेत भाषणाच्या सुरवातीलाच चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना झोडपल्याचं दिसून आलंय.

सभेच्या पोस्टरवर राहुल गांधींचा फोटो का नाही ? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितले

अशोक चव्हाण म्हणाले, विराट सभा पाहिल्यानंतर तुम्ही कितीही गौरवयात्रा तरी काही फरक पडणार नाही. ही मन की बात नाहीतर दिल की बात असल्याचं म्हणत अशोक चव्हाणांनी शिंदे-फडणवीस सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे.

Pune Crime News:राष्ट्रवादीच्या सरपंचाला निर्घृणपणे संपविले; मावळ हादरले!

तसेच महाविकास आघाडी देवगिरी किल्ल्यासारखी मजबूत झालीय. कितीही मोठा भूकंप आला तर फुटणार नाही. आले ते मावळे अन् गेले ते कावळे, या शब्दांत अशोक चव्हाणांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठीच महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

Narayan Rane : राणेंचं मंत्रिपद लवकरच जाणार ? ; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदारने केलंं भाकित

उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूपसला असून त्यांनी शिवसेनेचं चिन्ह आणि नावही घेऊन गेले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांची फोडाफोड केल्याचा आरोपही यावेळी केला आहे. दरम्यान, आता देशात लोकशाही टिकवायची की नाही? हे जनतेने ठरवायचे असल्याचंही ते म्हणालेत.

अतिशय प्रामाणिक, सहकाऱ्याला मुकलो शरद पवार यांची शरद काळेंना श्रद्धांजली

देशात सध्या बेरोजगारी, महागाई, मराठवाड्याचा विकास, असे गंभीर प्रश्न असतानाच सरकारची गौरवयात्रा सुरु आहे. या सरकारचे निर्णय बेभान अन् प्रसिद्धी वेगवान असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

या सभेत राष्ट्रवादीचे अजित पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे आमदार, खासदार पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube