Supriya Sule Criticizes Rupali Chakankar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणी (Pranjal Khewalkar Rave Party) अटक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी (Rupali Chakankar) पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला. त्यांनी दावा केला की, प्रांजल खेवलकर यांनी वापरलेल्या मोबाईलमध्ये काही मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळले आहेत.
पातळी सोडून राजकारण
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, या घटनेचे दोन स्पष्ट भाग आहेत. रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत, मात्र त्यांच्या नवऱ्याचा आणि पक्षाचा काहीही संबंध नाही, असे त्या म्हणाल्या. पुढे त्यांनी सवाल केला, तुमच्या बायकोच्या मोबाईलचा आणि चॅनेलचा काय संबंध? तसेच, मी कधीही पातळी सोडून राजकारण केले नाही. कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणे माझ्या स्वभावात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्राजक्ता गायकवाडचा साखरपुड्यातील राजेशाही अंदाज, पाहा PHOTO…
राईट टू प्रायव्हसी
सुप्रिया सुळे यांनी यावेळी ‘राईट टू प्रायव्हसी’च्या कायद्याची आठवण (Maharashtra Politics) करून दिली. या देशात गोपनीयतेचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाने आणि संसदेतून मान्य केलेला आहे. जर कोणाचा मोबाईल जप्त केला, तर तो फक्त न्यायालयाला दाखवता येतो; इतर कुणालाही नाही. तो बाहेर दाखवणे हा गुन्हा आहे. हा कायद्याचा नियम आहे, असे त्या म्हणाल्या.
अधिकाराचा गैरवापर होत असेल…
आमच्या पक्षातील सर्व सदस्यांची जबाबदारी मी घेते. पण त्यांच्या कुटुंबातील कोण काय करतो, यामध्ये मी हस्तक्षेप करत नाही. जर तुमचा मोबाईल सरकारने घेतला, तर तो मला दाखवण्याचा मला अधिकार नाही. जर या अधिकाराचा गैरवापर होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी असल्याची भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.
मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात तीन नवीन महापालिका होणार, अजित पवारांनी काय सांगितलं?
रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाई?
रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाई करावी की नाही, हा निर्णय सरकारने घ्यायचा असल्याचेही सुळे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असून त्यांचा कायद्याचा चांगला अभ्यास आहे. त्यांचा अनुभव आमच्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निर्णय त्यांनी घ्यावा, असे म्हणत सुळे यांनी या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली.