Pravin Darekar on Sharad Pawar for statement about party merger : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या वक्तव्यावर भाजप आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी पवारांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यातील मतदानाचा कल पाहता महाविकास आघाडीचे काय होणार आहे? याचे चित्र स्पष्ट झालेले दिसत आहे. म्हणून पुन्हा एकदा विलिनिकरणाचा पत्ता बाहेर काढला आहे.
शरद पवारांना आपला पक्ष चालवणं शक्य नसावं म्हणून…; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
प्रविण दरेकरांनी माध्यमांशी बोलताना पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली की, लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यातील मतदान झालं. त्यात पवारांना महाविकास आघाडीचे काय होणार आहे? याचे चित्र स्पष्ट झालेले दिसत आहे. म्हणून पुन्हा एकदा विलिनिकरणाचा पत्ता आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून फेकण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे.
T20 World Cup : आयर्लंड, पापुआ न्यू गिनी संघांची घोषणा; टी 20 वर्ल्डकप तयारी अंतिम टप्प्यात
शरद पवार परिस्थितीनुरूप रंग बदलत असतात. पुढे काय करायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले आहे. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनता त्यांना समर्थन देत आहे. भाजपा आणि महायुतीला प्रचंड जनाधार मिळताना दिसत आहे. एका बाजूला हुकूमशाही बोलता, एक प्रकारे घराणेशाहीचे समर्थन आपण करत आहात. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सगळेजण घराणेशाहीला साथ द्यायला, त्यांचे नेतृत्व स्वीकारायला तुम्ही मान्य आहात असं होतं.
आमच्या नेतृत्वावर टीका करत असताना किती पोकळपणा आहे. हे सुद्धा लक्षात येत. प्रादेशिक अस्मिता भाजपा, प्रत्येक पक्षाने जपली आहे. ती तुम्हाला संपुष्टात आणायची आहे असं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.