Professor finally suspended in IIT student death case! Major action taken following the registration of a case : मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये 22 वर्षीय विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात अखेर मुंबईतील आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रविवारी या प्रकरणी या प्राध्यापकासह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये 22 वर्षीय विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे याने त्याचं जीवन संपवलं. साहिल हा महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होता. शुक्रवारी (18 सप्टेंबर) त्याचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. परीक्षेदरम्यान मोबाईल फोनचा वापर करताना तो पकडला गेल्याच्या काही तासांनंतर ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी ….
साहिलच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील संबंधित तरतुदींनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे.
हप्ता थकला म्हणून बळजबरीने वाहन जप्त करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
साहिलच्या वडिलांनी गेल्या तीन महिन्यांपासून मुलाचा मानसिक छळ करण्यात आल्याचा तसेच जातीय स्वरूपाचे अपशब्द वापरल्याचा आरोप केला आहे. ज्या परीक्षेदरम्यान साहिल मोबाईल वापरताना पकडला गेला, त्या परीक्षेचे पर्यवेक्षण प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला करत होते. संचालक शिरीष बी. केदारे यांच्या सांगण्यावरून दुल्ला यांनी साहिलला जातीय स्वरूपाचे अपशब्द वापरल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे.
समय रैना लवकरच बोहल्यावर चढणार? लग्नाच्या चर्चांवर थेट अभिनेत्रीला टॅग करत सोडलं मौन
साहिलच्या आईनेही संस्थेत मुलाचा छळ झाल्याचा आरोप केला आहे. “माझ्या मुलाचा छळ करण्यात आला. मला न्याय हवा,” अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मुंबईतील कबुतरखान्यांवरून संघर्ष तीव्र, मंगलप्रभात लोढा मुनी निलेशचंद्र महाराजांच्या निशाण्यावर
दरम्यान, आयआयटी बॉम्बेने या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. परीक्षेदरम्यान साहिलने प्रश्नपत्रिका ‘चॅटजीपीटी’वर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे संस्थेने म्हटले आहे. मात्र, या प्रकरणी त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती, असा दावा आयआयटी बॉम्बेने केला आहे. परीक्षेतील या प्रकाराबाबत संबंधित प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी साहिलशी चर्चा करून त्याचे समुपदेशन केले होते. तसेच या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार नाही, अशी त्याला खात्री देण्यात आली होती, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
‘जयंती 2’ला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद, दुसऱ्या आठवड्यात 2 कोटी रुपयांचा व्यवसाय
साहिलच्या खोलीतून बराच वेळ प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच्या वसतिगृहातील मित्रांना संशय आला. त्यांनी संस्थेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर ही घटना समोर आली. कुटुंबीयांनी केलेले जातीय छळाचे आरोप आणि आयआयटी बॉम्बेने दिलेले स्पष्टीकरण या दोन्ही बाबींचा पोलिस आता तपास करत आहेत.
