Download App

Swargate Rape Case : ‘तो मला सतत फोन अन् मॅसेज करायचा…’ दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीकडून धक्कादायक खुलासा

  • Written By: Last Updated:

Swargate Case Accused Dattatray Gades Lady Friend Inquiry : पुण्यात स्वारगेटमध्ये (Swargate) 26 वर्षीय तरूणीवर अत्याचार झाला. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला जातोय. याप्रकरणी पुणे पोलिसांनी एक लाखाचं बक्षीस देखील जाहीर केलंय. तर आरोपीचा शोध घेण्यासाठी तब्बल आठ पथकं कामाला लागली (Pune Crime) आहेत. दरम्यान पोलिसांनी आता आरोपी दत्ता गाडेच्या एका मैत्रिणीची देखील सखोल चौकशी केल्याचं समोर आलंय.

स्वारगेट एसटी आगारात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय गाडेचा पुणे पोलिसांकडून कसून शोध घेत आहेत. कालपर्यंत दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांची आठ पथके शोध घेत (Crime News) होती. मात्र, आता या पथकांची संख्या 13 वर पोहोचली आहे. दत्तात्रय गाडे लपण्यासाठी कुठे जाऊ शकतो, या सर्व शक्यता विचारात पुणे पोलीस घेत आहेत. त्यांनी त्या पार्श्वभूमीवर चारही बाजूंना पथके रवाना केलीत.

‘जीव जळतोय…’ उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंच्या कृतीचं समर्थन, ऑडिओ क्लिप…

पुणे गुन्हे शाखेने दत्ता गाडेच्या मित्र परिवाराची देखील चौकशी केलीय. त्याच्या एका मैत्रिणीला पोलिसांनी चौकशी करण्यासाठी भोरवरून पुण्यात आणलं. यावेळी धक्कादायक माहिती पोलीसांच्या हाती (Pune Rape Case) लागली. दत्ता मला सारखे फोन आणि मेसेज करायचा. या दोघांची अजून एक मैत्रिण होती. तिच्यासोबत माझी भेट घालून दे, आमचं पॅचअप करून दे, असा सारखा तगादा त्याने लावला होता. यासाठी दत्ता सारखे फोन, मेसेज करत मला त्रास द्यायचा असंही त्यांच्या मैत्रिणीने सांगितलंय.

ही सर्व धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर दत्ता गाडेने अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, असा अंदाज पोलीस खात्यातून वर्तवला जातोय. याआधी देखील त्याने अनेक महिलांना त्रास दिला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या अनुषंगाने देखील पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत त्याच्या जवळपास दहा मित्र-मैत्रिणींची चौकशी पोलिसांनी केलीय. त्यांच्याकडून आरोपीबद्दल खडानखडा माहिती देखील काढून घेतलीय.

शिंदेंना मोठा धक्का; भाजपने दिल्लीतून सूत्रं फिरवली, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला

दत्तात्रय गाडेचं मूळ गावं शिरूर असल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी त्याच्या घरी शिरूरमध्ये कडेकोट बंदोबस्त लावलाय. त्याच्या आई-वडिलांना आणि भावाला चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेण्यात आलंय. त्यामुळं आता आरोपी कधी पोलिसांच्या गळाला लागतोय, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

 

follow us