Download App

मोठी बातमी! पुण्याच्या कुख्यात गुंडाचा सोलापूरमध्ये एन्काऊंटर, शाहरुख शेख पोलिसांच्या गोळीबारात ठार

Pune Gangster Encountered by Police In Solapur : सोलापूरमध्ये एका सराईत गुंडाचा मध्यरात्री एन्काऊंटर झाल्याची (Pune Gangster Encountered) बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. 23 वर्षीय शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झालाय. सोलापुरातील (Solapur) लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली (Crime News) आहे. त्याला गंभीर अवस्थेमध्ये सोलापूर शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यानच मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

सोलापुरातील लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेने शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेखचा खात्मा केलाय. तो एक सराईत गुंड असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्यावर पुणे पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत. मागील काही दिवसांपासून तो सोलापुरातील लांबोटी (Gangster Encounter) गावाजवळ लपून बसला आहे, अशी माहिती पुणे पोलिसांच्या हाती लागली. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्रीच रवाना झाले अन् लांबोटी येथे पोहोचले.

देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीत कोणती चर्चा झाली? संजय राऊतांनी केला मोठा दावा

पोलिसांच्या कारवाईमध्ये शाहरूख गंभीर जखमी

पोलिसांनी शाहरूख लपलेल्या घरामध्ये मोठी छापेमारी केली. त्यावेळी शाहरूखने पोलिसांवर गोळीबार केला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या गोळीबाराला प्रत्युत्तर देत असताना पोलिसांच्या कारवाईमध्ये शाहरूख गंभीर जखमी झाला. त्याला त्याच अवस्थेत सोलापुरच्या शासकीय रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. परंतु उपचारावेळी शाहरूखचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

घरात बंद करून जिवंत जाळले, गोळ्या घातल्या… नायजेरियात बंदूकधाऱ्यांचा क्रूर हल्ला, 100 जणांचा मृत्यू

15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे

पोलीस ठाण्यांमधून सुमारे 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे शाहरुख शेखवर दाखल आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आलीय. मकोकाच्या गुन्ह्यातच शाहरूख फरार होता. त्याच्यावर आर्म अक्टचे जवळपास पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. पुणे क्राईम ब्रांचचे पथक आणि मोहोळ पोलीस ठाण्याच्या मदतीने ही संयुक्त मोहीम राबवली आहे.

 

follow us