Solapur Loksabha : मतदान झालं! कोण उधळणार गुलाल? उमेदवारांची वाढली धाकधूक

Solapur Loksabha : मतदान झालं! कोण उधळणार गुलाल? उमेदवारांची वाढली धाकधूक

Prakash Ambedkar News : राज्यात चार टप्प्यांतील लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मतदान पार पडलं. सोलापुर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) तर महायुतीकडून राम सातपुते (Ram Satpute) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मतदानानंतर सर्वच पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे. पण विजयाचा गुलाल कोण उधळणार याचं उत्तर ४ जूनलाच मिळणार आहे.

मोदींच्या सभा अन् महायुतीचे आमदार, राम सातपुतेंचं टॉनिक
सोलापूर मतदारसंघात मागील वेळी भाजपाचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी विजय मिळवला होता. आता हेच रेकॉर्ड कायम ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. परंतु, यंदा चेहरा बदलला आहे. महायुतीचे उमेदवार राम सातपुते आहेत. हिंदुत्ववादी चेहरा अन् हिंदुत्वाचा जोरदार प्रचार करत आहेत. सोबत केंद्र आणि राज्य सरकारची विकासकामे, विविध योजना लोकांसमोर मांडत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारसंघात येऊन गेलेत. या जमेच्या बाजू असून वातावरण आपल्या बाजूने राहिल असा विश्वास राम सातपुते आणि समर्थकांना वाटतो. मतदारसंघात सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे मदत होईल असा विश्वास राम सातपुते यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.

सरकारी कंपन्यांची विक्री, खासगीकरणातून दूर करणार कंगाली; पाकिस्तानचा अजब निर्णय

परंतु, सोलापुरात बाहेरचा उमेदवार म्हणून विरोधकांकडून प्रचारही होत आहे. या प्रचाराला काउंटर करण्याचा प्रयत्न राम सातपुतेंकडून केला जात आहे. सोलापुरातील शहरी मतदारांवर त्यांची भिस्त आहे. सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा-पंढरपूर, अक्कलकोट आणि मोहोळमध्ये महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मताधिक्य मिळण्याची अपेक्षा राम सातपुतेंना आहे.

शिवाय मतदारसंघात अतिष बनसोडे उमेदवारी करत आहेत. त्यामुळे लढत तिरंगी झाले आहे. आता मतविभागणी निश्चित आहे. या मतविभागणीचा कुणाला फटका बसणार आणि कुणाला फायदा होणार याचं उत्तर निकालानंतरच मिळणार आहे. अतिष बनसोडेंकडून मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांचा मुद्दा पुढे केला जात आहे. सोलापूर अजूनही शहर वाटत नाही. रस्त्यांची अवस्था खराब आहे. येथे मोठे उद्योग नाहीत त्यामुळे विकास रखडला आहे. विडी कामगारांचे प्रश्न कायम आहेत. शहरातील मुले पुणे मुंबईत जात आहेत. मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यात काँग्रेस आणि भाजप दोन्ही अपयशी ठरल्याची टीका बनसोडे करतात.

खिलाडी कुमार आणि प्रभासच्या आगामी चित्रपटाचा टीझर जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात होणार प्रदर्शित

वडिलांना संधी दिली आता मुलीलाही द्या, प्रणितींची भावनिक साद
सोलापूर हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ. येथे अकरा वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. मात्र, मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. आता पक्षाने त्यांच्याऐवजी सोलापूर मध्य मतदारसंघातील आमदार प्रणिती शिंदे यांना तिकीट दिले आहे. सोलापूर मध्य मतदारसंघात त्यांचा हक्काचा मतदार आहे. मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु, तिसरा उमेदवार रिंगणात आहे त्यामुळे मतविभागणीचा फटका बसू शकतो असे सांगितले जात आहे. शहर विकासाची संधी आधी वडिलांना दिली आता मुलीलाही संधी द्या, अशी भावनिक साद त्या मतदारांना घालत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज